radiology
radiology 
एज्युकेशन जॉब्स

रेडिओलॉजिस्ट बनायचं स्वप्न बघताय? महिन्याला मिळतो ५० हजार पगार; मग जाणून घ्या संपूर्ण माहिती 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आता तुम्हाला वाटत असेल कि रेडिओलॉजी म्हणजे रेडिओमध्ये काम करायचंय की काय? असं अजिबात नाही. हे मेडिकलशी मिळतंजुळतं एक फिल्ड आहे. X-Ray च्या मदतीने रेडिओग्राफर रुग्णाचा रेडिओोग्राफी अहवाल तयार करतो. हे रुग्णाच्या आजाराबद्दल अचूक माहिती देते. रेडिओोग्राफर रेडिओोग्राफी अहवाल तयार करण्यासाठी एक्स-रे व्यतिरिक्त सीटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड आणि एमआरआयचा अभ्यास करतो. चला तर जाणून घेऊया यातीळ करिअरच्या संधींबाबत. 

रेडिओलॉजी दोन क्षेत्रात विभागली गेली आहे. एकाचे नाव डायग्नोस्टिक रेडिओलॉजी आणि दुसरे इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी आहे. डायग्नोस्टिक रेडिओलॉजी X-Ray आणि इतर इमेजिंग तंत्राच्या सहाय्याने रोग आणि इजा ओळखतो. तर इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीमध्ये, डॉक्टर केवळ इमेजिंगचाच अर्थ लावत नाही तर काही प्रमाणात शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेचे कार्य देखील करतो.

करिअरच्या संधी 

भविष्यात या क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये बरीच वाढ होईल. या क्षेत्रात पदवी पूर्ण केल्यावर आपण रेडिओलॉजिस्ट, रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी / रेडिओग्राफर, रेडिओलॉजी टेक्निशियन, अल्ट्रासाऊंड टेक्निशियन / डायग्नोस्टिक मेडिकल सोनोग्राफर, एमआरआय टेक्निशियन, सीटी टेक / कॅट स्कॅन टेक्नॉलॉजिस्ट / सीटी स्कॅन टेक्नॉलॉजिस्ट बनू शकता.

असे व्हा रेडिओलॉजिस्ट 

रेडिओलॉजिस्टचे करिअर बॅचलर डिग्री पूर्ण झाल्यापासून सुरू होते. मेडिकल स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर तुम्हाला एमओ किंवा डीओ मध्ये पदवी दिली जाते. त्यानंतर आपण वैद्यकीय परवाना म्हणून अर्ज करू शकता आणि आपण फिजिशियन म्हणून सराव करण्यास सक्षम असता. 

रेडिओलॉजिस्ट होण्यासाठी, फिजिशियनला रेडिओलॉजी रेसिडेन्सीची चार वर्षे पूर्ण करावी लागतात. रेडिओलॉजिस्टसाठी राज्य परवाना देखील खूप महत्वाचा आहे. दोन भागांच्या परीक्षेनंतर परवाना देण्यात येतो. दोन भागांमध्ये औषध, शरीरशास्त्र, इमेजिंग-संबंधित तंत्र आणि भौतिकशास्त्र यांचा समावेश आहे.

कोर्सेस 

रेडिओलॉजीच्या क्षेत्रात डिप्लोमा कोर्स, बॅचलर कोर्स, मास्टर कोर्स आणि सर्टिफिकेशन कोर्सचा पर्याय आहे. बारावीनंतर तुम्ही UG अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकता. रेडिओलॉजी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या कोर्सेसची माहिती खाली दिली आहे.

डिप्लोमा कोर्सेस (कालावधी २ वर्षं)

डिप्लोमा इन रेडियोग्राफी अँड रेडियोथेरपी
डिप्लोमा इन रेडियो-डायगनोस्टिक टेक्नॉलॉजी

बॅचलर कोर्सेस (कालावधी ३ वर्षं)

B. Sc इन रेडियोग्राफी 
B. Sc मेडिकल (ऑनर्स) इन डियोथेरापी टेक्नॉलजी

मास्टर कोर्सेस (कालावधी २ वर्षं)

पोस्ट ग्रैजुएट डिप्लोमा इन रेडियोथेरापी टेक्नॉलजी  
पोस्ट ग्रैजुएट डिप्लोमा इन रेडियो डायग्नोसिस अँड इमेजिंग सायन्सेस 
पोस्ट ग्रैजुएट डिप्लोमा इन एक्स-रे रेडियोग्राफी अँड अल्ट्रा सोनोग्राफी

सर्टिफिकेट कोर्स

सर्टिफिकेट इन रेडियोग्राफी
सर्टिफिकेट इन रेडियोलॉजी असिस्टेंट
सर्टिफिकेट इन रेडियोग्राफी डायग्नोस्टिक

टॉप कॉलेजेस 

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस 
आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
क्रिस्चन मेडिकल कॉलेज, वेल्लुरु
जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रैजुएट मेडिकल एजुकेशन अँड रिसर्च, पुडुचेरी

किती मिळेल पगार 

रेडिओलॉजिस्टला तिच्या जॉबच्या टायटलनुसार पगार मिळतो. जागतिक स्तरावर रेडिओलॉजिस्टचा पगार वर्षाकाठी सुमारे 70 हजार डॉलर्स आहे. भारतात वार्षिक 5 लाखाहून अधिक पॅकेज उपलब्ध आहे.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT