DJ Party esakal
एज्युकेशन जॉब्स

डिजे क्षेत्रात करिअरच्या वाटा

प्रत्येक सण, उत्सवामध्ये डिजेचा आवाज आल्या शिवाय सण साजरे होत नाही. मात्र, हे क्षेत्र आहे तरी काय?

सकाळ वृत्तसेवा

डिस्क जॉकी, म्हणजेच ज्याला आपण डिजे म्हणतो हे क्षेत्र आपल्याला काही नवीन नाही. प्रत्येक सण, उत्सवामध्ये डिजेचा आवाज आल्या शिवाय सण साजरे होत नाही. मात्र, हे क्षेत्र आहे तरी काय? प्रत्येक गाण्यावर प्रत्येकाला थिरकायला लावणारा हा ‘डिजे’ तयार तरी कसा होता? या क्षेत्रातील करियरच्या वाटा आपण जाणून घेणार आहोत.

या क्षेत्रातील अभ्यासक्रम

डीजेचा कोर्स तुम्हाला १० वी किंवा १२ वी व ग्रॅज्युऐशन नंतरही करता येतो. अनेक उत्तम संस्था आज डीजे सारख्या तुलनेने नव्या क्षेत्रातील मार्गदर्शनपर कोर्सेस देत आहेत. डीजेचे सर्टिफाईड कोर्सेस असतात. तसेच, डिप्लोमा कोर्सेस असतात तर काही संस्था म्युझिक प्रॉडक्शनचे कोर्सेसही घेतात. डीजेच्या बेसिक किंवा फाउंडेशन कोर्स पासून सुरवात करून, पुढे तुम्ही स्पेशलाइज्ड कोर्स करू शकता. या कोर्सेसचा कालावधी १ महिन्यापासून ते १ वर्षापर्यंत असू शकतो व कालावधी आणि कोर्सची व्याप्ती यानुसार, डीजे कोर्सची फी बदलते. जर तुम्ही साउंड किंवा ऑडिओ इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, तर तुम्हाला डीजेईंगचे तंत्र समजून घेणे सोपे होईल. तसेच, जर संगीताचे शिक्षण घेतले, तर तुमची लय-ताल आणि सुरांची समज वाढल्यामुळे, गाणी मिक्स करताना तुम्हाला या शिक्षणाचा चांगला उपयोग होईल.

मराठी भाषेमध्येही कोर्सेस

डीजे कोर्स तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता. मराठी भाषिक किंवा ज्यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, त्यांना एखादा नवीन कोर्स जर इंग्रजीतून करायचा झाला तर भाषेची अडचण येते. ही अडचण समजून घेऊन काही संस्थांनी मराठीतून डीजे कोर्स देण्यास सुरवात केली आहे.

डिस्क जॉकी (डीजे) म्हणजे कोण?

प्रेक्षकांना किंवा एखाद्या ठिकाणी जमलेल्या समुदायाला रेकॉर्डेड संगीत ऐकवणारी व्यक्ती म्हणजे डिस्क जॉकी. या संज्ञेतील डिस्क हा शब्द विनाईल रेकॉर्ड वरून आला. पण, आजचा डीजे हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकवतो.

डिस्क जॉकी कसे बनाल?

डीजे होण्यासाठी कोणत्याही कॉलेज किंवा युनिवर्सिटीचा डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स नाही. त्यामुळे, एखाद्या चांगल्या संस्थेचा डीजे कोर्स करणे पुरेसे असते. कोर्स करण्या इतकेच महत्त्वाचे आहे स्वत: वेळ काढून साउंड मिक्सिंग आणि रीमिक्सचे तंत्र शिकणे व डीजेला लागणाऱ्या सोफ्टवेयर्सचा अभ्यास करणे. तसेच, चांगले आणि विविध प्रकारातील संगीत ऐकणे आणि अनेकविध शैलीतील गाण्यांचा संग्रह करणेही आवश्यक असते.

शिक्षण देणाऱ्या संस्था

  •  मुंबई म्युझिक इंस्टिट्यूट, मुंबई

  •  ग्लोबल डिजे म्युझिक प्रॉडक्शन ॲंड डिजे ट्रेनिंग अकादमी, मुंबई

  •  रामोजी क्रियन युनिव्हर्स, हैदराबाद

  •  स्क्रॅचलॅब डिजे अकादमी, चेन्नई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : मोबाईलवरील ट्रॅफिक E Challan इग्नोर केल्यास थेट दोन प्रकारची कायदेशीर कारवाई; १९ लाख चलन थकित, ४१० कोटींच्या वसुलीची मोहीम

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

पाय घसरला आणि.., पडता पडता थोडक्यात वाचली जेनिलिया, सोशल मीडियावर Viral Video

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार

SCROLL FOR NEXT