Career Tips
Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career tips : करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्या रूटीनमध्ये ‘या’ सवयींचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : यश मिळवणे किंवा यशस्वी होणे या बद्दलच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही सवयी लावून घेणे महत्वाचे असते.

या सवयी तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रभावी बनवतात आणि या सवयींमुळे तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ पोहचायला मदत होते. या सवयींचा समावेश जर तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये केला तर करिअरमध्ये यशस्वी व्हायला तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात या सवयींबद्दल.

गडबडीमध्ये काम करू नका

तुमचे ध्येय गाठण्यासाठी गडबडीमध्ये किंवा घाईमध्ये काम कधीच करू नका. उलट यामुळे, तुमच्या चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे, कधीच घाईमध्ये काम करू नका.

जर तुम्हाला खरच यशस्वी व्हायचे असेल तर, कधीच तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी घाईत काम करू नका. अनेकदा गडबडीत काम केल्यामुळे, चुका होतात. त्यामुळे, ते काम पुन्हा नव्याने करावे लागते.

समस्यांवर मार्ग शोधा

जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असता तेव्हा, वाटेत अनेक समस्या येतात. या समस्यांना तोंड देण्याचे काम तुम्ही करता. अशा परिस्थितीमध्ये मग त्या समस्यांविषयी तक्रार करण्याऐवजी किंवा निराश होण्याऐवजी तुम्ही त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. त्या समस्यांचे निराकारण करा.

दुसऱ्यांवर आरोप करू नका

यशस्वी करिअरच्या दिशेने पाऊल टाकत असताना तुमच्या हातून अनेकदा चुका होतील. या चूका स्विकारून त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. त्या चुकांबद्दल दुसऱ्यांवर आरोप करू नका.

अनेकांना सवय असते की, झालेल्या चुकांबदद्ल दुसऱ्यांवर आरोप करणे. तसेच, विचार न करता एखाद्यावर आरोप केल्याने याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो. ही सवय तुम्हाला असेल तर वेळीच ही सवय मोडा.

कामाची टाळाटाळ करू नका

कोणतेही क्षेत्र असो आजकाल कामांची टाळाटाळ करताना अनेक जण दिसतात. परंतु, जर तुम्हाला करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर, तुम्हाला या सवयीपासून लांब रहावे लागेल. वेळच्या वेळी काम करणे आणि त्या कामात चुका टाळणे इत्यादी गोष्टींवर फोकस ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: पंतप्रधानांनी विधानसभेसाठी अजून सभा घ्याव्यात... शरद पवारांनी का मानले मोदींचे आभार ?

Latest Marathi Live Updates: संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई होती - उद्धव ठाकरे

Types Of Biryani: बकरी ईदनिमित्त बनवा 'या' 5 प्रकारच्या बिर्याणी, ईदचा आनंद होईल द्विगुणित

MVA Meeting : नाना पटोलेंच्या अनुपस्थितीत पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा; आगामी विधानसभा निवडणुका...

Share Market: सलग 3 दिवस शेअर बाजार बंद; NSE-BSE वर शेअर्सची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT