एज्युकेशन जॉब्स

महिलांनाे! जाणून घ्या पत्रकारिता, फॅशन डिझाईनिंगच्या करिअरबद्दल

गणेश पिटेकर

भारतातील महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करित आहेत. त्यांच्या आज अवतीभवती खूप करिअरचे पर्याय आहेत. नर्स आणि शिक्षक या व्यतिरिक्तही खूप पर्याय उपलब्ध आहेत. 


पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन

पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन प्रोफेशन खूपच आव्हानात्मक आणि जोखीमपूर्ण आहे. असे असतानाही बहुतेक महिला या करिअरची निवड करताना दिसत आहेत. येथे जाॅब सॅटिसफॅक्शनसोबतच प्रसिद्धही मिळते. डिजिटल मीडियामुळे पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनचे कार्यक्षेत्र वाढले आहे. आता बातमीदार, काॅपी रायटर्स, प्रोड्युसर, अँकर्स, एक्स्पर्ट्स आणि स्तंभलेखक म्हणून काम करता येते. 

पात्रता

पदवीची डिग्री मिळविण्यासाठी तुम्हाला १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर डिग्री मिळविण्यासाठी  पदवीची डिग्री मिळविणे अत्यावश्यक आहे. 

शैक्षणिक संस्था

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली
 
एशियन काॅलेज आॅफ जर्नालिझम, चेन्नई

जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली

डिपार्टमेंट आॅफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
पुणे

सिम्बायसिस इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन, पुणे

नवी दिल्ली वायएमसीए, नवी दिल्ली

भारतीय विद्या भवन, दिल्ली आणि मुंबई.

नोकरीची संधी कुठे?

वेगवेगळे वर्तमानपत्रे, वृत्तसंस्था, मासिके, संकेतस्थळे, सरकारी आणि प्रायव्हेट चॅनल्स आपल्या कार्यालयांमध्ये पत्रकारांना बातमीदारी, संपादन आणि काॅपी रायटिंगच्या कामावर ठेवते. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि वृत्त वाहिन्यांमध्ये खूप सारे नोकऱ्यांची संधी आहे. 

जाहिरात क्षेत्र 

सध्या जाहिरात हे क्षेत्र खूप आकर्षक आणि आवडते प्रोफेशनम्हणून पुढे येत आहे. इथे तुम्हाला गंमतीने बरोबरच सर्जनशीलतेला संधी आहे. 

पात्रता 

पदवी पातळीवरचे जाहिरातविषयक कोर्ससाठी पात्रता १२ उत्तीर्ण गरजेचे आहे. पदव्युत्तरसाठी पदवी आवश्यक आहे. जाहिरातीचे करिअर सुरु करण्याचे सर्वात चांगली पद्धत म्हणजे कोणत्याही अॅड एजन्सीमध्ये नोकरी करा. 

शैक्षणिक संस्था

भारती विद्या भवन : मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली

सेंटर फाॅर मास मीडिया, वायएमसीए, नवी दिल्ली

केसी काॅलेज आॅफ मॅनेजमेंट, मुंबई

मुद्रा इन्स्टिट्यूट आॅफ कम्युनिकेशन्स, अहमदाबाद 

नरसी मोंजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई

सेंट झेव्हियर्स काॅलेज आॅफ कम्युनिकेशन्स, मुंबई

नोकरीची संधी 

तुम्हाला अॅड एजन्सी, रेडिओ चॅनल्स, मीडिया हाऊसेस, ई काॅमर्स स्टोर्स, एफएमसीजी कंपन्या आणि पीआर एजन्सीमध्ये नोकरी मिळू शकते . 

फॅशन डिझाईनिंग

आजकल प्रत्येकाला नीटनेटक राहिला आवडते. आपला इतरांवर प्रभाव पडावा यासाठी प्रयत्न चालू असतात. फॅशन डिझाईनिंग सर्वांत आवडीचे करिअर पर्याय आहे. 

पात्रता

फॅशन डिझाईनिंग कोर्स करण्यासाठी प्राथमिक पात्रता म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे होय. तुम्ही दोन प्रकारचे कोर्स करु शकता - फॅशन टेक्नोलाॅजीत पदवीची डिग्री आणि फॅशन डिझाईनिंगमध्ये बॅचलरची डिग्री

शैक्षणिक संस्था

सीईपीजेड इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नाॅलाॅजी, मुंबई

 जेडी इंन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नोलाॅजी ( विभिन्न शहर) 

 नॅशनल इन्स्टिट्यू आॅफ फॅशन डिझाईन, कोलकत्ता

नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नोलाॅजी(नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, गांधीनगर 

पर्ल अॅकडेमी आॅफ फॅशन, नवी दिल्ली

सोफिया पाॅलिटेक्निक, मुंबई 

नोकरीची संधी

एका कुशल आणि हुशार फॅशन डिझायनरला अपॅरल कंपन्या, निर्यात गृहे आणि राॅ मटेरियल उद्योगात एक स्टायलिस्ट किंवा डिझाईनर म्हणून नोकरी मिळू शकते. चांगला अनुभव मिळाल्यानंतर तुम्ही फॅशन बुटीकही उघडू शकता. कोणत्याही फॅशन डिझायनिंग ग्रॅज्युएटसाठी व्हिज्युल मर्केडायजिंग, काॅस्च्युम डिझायनिंग आणि फॅशन रायटिंगसह इतर चांगले करिअर पर्याय आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT