Central Railway Junior Technical Associate Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज; 'ही' आहे शेवटची तारीख

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची आहे.

Central Railway Junior Technical Associate Recruitment 2022 : सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची आहे. मध्य रेल्वेनं (Central Railway) ज्युनियर टेक्निकल असोसिएट (Junior Technical Associate) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे ज्युनियर टेक्निकल असोसिएटच्या 20 पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवार रेल्वेच्या indianrailways.gov.in अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरु करण्याची तारीख : 21 फेब्रुवारी 2022

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2022

वयोमर्यादा : ज्युनियर टेक्निकल असोसिएटच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण उमेदवारांचं वय 14 मार्च 2022 रोजी 18 ते 33 वर्षे असावं. तर ओबीसी उमेदवारांचं वय 18 ते 36 वर्षे असावं. आरक्षित प्रवर्गासाठी सरकारी नियमानुसार सूट देण्यात आलीय. तसेच SC आणि ST उमेदवारांचं वय 18 ते 38 वर्षे असावं.

शैक्षणिक पात्रता : या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/ Diploma/ B.Sc in Civil Engineering असणं आवश्यक आहे. सर्वसाधारण उमेदवाराला बॅचलर पदवीमध्ये किमान 60% गुण असावेत. तसेच ओबीसीसाठी 55% आणि एससी-एसटीसाठी 50 टक्के गुण असणं गरजेचं आहे.

रिक्त जागा

  • UR - 8

  • ST - 3

  • SC - 2

  • OBC - 5

  • EWS - 2

  • एकूण - 20

वेतन : या भरती मोहिमेअंतर्गत ज्युनियर टेक्निकल असोसिएटच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना शहरनिहाय वेतन मिळेल. 'झेड' वर्ग शहरात काम करणार्‍या उमेदवाराला दरमहा 25,000 रुपये, तर Y वर्गातील उमेदवाला 27000 रुपये आणि X वर्गाला 30000 रुपये दरमहा पगार मिळणार आहे.

अर्ज फी : आरक्षित प्रवर्गातील (एसटी, एससी, ओबीसी, महिला) उमेदवारांना अर्ज फी म्हणून 250 रुपये भरावे लागतील. तर, सर्वसाधारण पुरुष उमेदवारांना 500 रुपये भरावे लागणार आहेत. दरम्यान, ही रक्कम परत केली जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News:'खासदार शाहू महाराजांनी दिली प्रतापगडावर भेट'; शिवभक्तांची गडावर मोठी गर्दी, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा

जीवघेण्या उठाबशा !

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT