CET Exam sakal
एज्युकेशन जॉब्स

CET Exam : सीईटी परीक्षेत आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा

राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेदरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरसूची, यावर आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेदरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरसूची, यावर आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पहिल्यांदाच अशा प्रकारची सुविधा विकसित केली असून ती यंदा पहिल्यांदाच खुली करण्यात आली आहे.

सीईटी सेलमार्फत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या दरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची यावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना आक्षेप, हरकती नोंदविता येतात. त्यासाठी आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी परीक्षानिहाय स्वतंत्र कालावधी देण्यात येईल. त्या कालावधीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार असल्याचे सीईटी सेलने सांगितले आहे.

‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यात येत आहे. या यंत्रणेच्या सहाय्याने संबंधित आक्षेप, हरकत नोंदविणाऱ्यांना आक्षेपांवर काय कार्यवाही झाली, याची माहिती देखील तपासता येणार आहे. या हरकती नोंदविण्यासाठी संबंधित उमेदवारांना शुल्कही द्यावे लागणार आहे. या यंत्रणेअंतर्गत विविध प्रवेश परीक्षांच्या सीईटी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवर आणि उत्तरसूचींवर आक्षेप आणि हरकती नोंदविण्याचे वेळापत्रक दिले आहे. या संदर्भातील वेळापत्रक आणि तपशील सीईटी सेलने ‘https://cetcell.mahacet.org’ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची नोंदणी करताना वापरलेल्या लॉगिनद्वारेच आक्षेप-हरकती नोंदविता येणार आहेत, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ सुविधेची वैशिष्ट्ये :

परीक्षार्थीला संबंधित परीक्षेतील पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नावर आणि त्यांच्या उत्तरावर आक्षेप असल्यास तो या यंत्रणेद्वारे नोंदविता येणार संबंधित परीक्षार्थीच्या अर्ज नोंदणीसाठी वापरलेल्या ई-मेल आणि लॉगिंनमधूनच या सुविधेचा वापर शक्य संबंधित उमेदवाराला प्रति प्रश्न/प्रति हरकत किंवा आक्षेपासाठी एक हजार रुपयांचे शुल्क ऑनलाइन द्यावे लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT