Chancellor of Desbhagat University Chandigarh Prof Abhijeet Joshi education pune sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune News : चंदीगडच्या देशभगत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. अभिजीत जोशी

सांगली जिल्ह्यातील शिराळा या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत जोशी यांची नामांकनाद्वारे चंदीगडच्या देशभगत युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे. सोमवारी (ता.३) गुरूपौर्णिमेला ते कुलगुरूपदाचा पदभार स्विकारणार आहेत.

सांगली जिल्ह्यातील शिराळा या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर शिराळ्यातीलच न्यू इंग्लिश स्कूल येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून आयुर्वेदाचार्य आणि एम.ए.संस्कृत हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानं तेंव्हाच्या पुणे विद्यापीठ येथून एम.डी. आयुर्वेद हा अभ्यासक्रम व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथून पी.एच.डी. हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

भारत व परदेशातील अशा एकूण सहा विद्यापीठांतून त्यांनी डी.लिट व डी.एस्सी. या अतिशय प्रतिष्ठेच्या पदवी प्राप्त केल्या.

शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर येथून संस्कृत, वैदिक व अद्वैत वांङमयाचे अध्ययन पूर्ण केले. गेली बावीस वर्षे महाराष्ट्र व कर्नाटक येथे अध्यापन व संशोधन केले, जे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे.

त्यांचे ७० पेक्षा अधिक शोधनिबंध भारत व परदेशांत प्रकाशित झाले आहेत. त्यांनी आयुष मंत्रालय भारत सरकार यांचेद्वारा प्राप्त ७ संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून २ आंतराष्ट्रीय प्रकल्पांसाठी सध्या संशोधन सुरू आहे.

अमेरिकेतील बॉस्टन येथील हार्डवर्ड युनिव्हर्सिटी, फ्लोरिडा येथील योग संस्कृथम युनिव्हर्सिटी, मलेशिया येथील लिंकन कॉलेज युनिव्हर्सिटी, कर्नाटक संस्कृत युनिव्हर्सिटी तसेच डेक्कन कॉलेज या संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन सादर करून प्राचीन भारतीय शास्त्रांबाबत संशोधनाची नवी दिशा आयुर्वेद जगतास दिली.

या समाजोपयोगी संशोधनाची दखल घेत भारत सरकारने २०१९ साली त्यांना बादरायण व्यास हा राष्ट्रपती सन्मान प्रदान केला. २०२१ साली भारत किर्तीमान अलंकरण, या खेरीज महाराष्ट्र गौरव पुरस्कार, हार्डवर्ड युनिव्हर्सिटी ग्लोबल सिस्टीम्स् अवॉर्ड प्राप्त झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT