U19 England Cricket Team
Sakal
Cricket
U19 World Cup: ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगलं! इंग्लंडच्या संघाने दणदणीत विजयासह गाठली फायनल; कर्णधार चमकले
England Qualify for Final of U19 WC 2026: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने धडक मारली आहे. इंग्लंडने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपले.
England Qualify for T20 World Cup 2026 Final: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना मंगळवारी (३ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात पार पडला. बुलावायो येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या युवा संघाने २७ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आहे.
इंग्लंडने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या (U19 World Cup) अंतिम सामन्यात पोहचण्याची ही तिसरी वेळ आहे. १९९८ आणि २०२२ मध्ये त्यांनी अंतिम सामना गाठला होता. मात्र या पराभवामुळे युवा ऑस्ट्रेलिया संघाचे (U19 Australia) विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगलं आहे. इंग्लंडच्या या विजयात कर्णधार थॉमस ऱ्यूचा (Thomas Rew) मोठा वाटा राहिला. त्याने दमदार शतक ठोकलं होतं.

