संपादन  sakal
एज्युकेशन जॉब्स

संवाद - माहिती संपादन आणि संदर्भशोधन

आपला अभ्यास जास्त परिपूर्ण होण्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जायला हवे

सकाळ वृत्तसेवा

डाँ. उमेळ दे. प्रधान

आपला अभ्यास जास्त परिपूर्ण होण्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जायला हवे. अभ्यासात वाचन करत असताना पाठ्यपुस्तकातील माहिती कदाचित अपुरी, अस्पष्ट, कमी असण्याची शक्यता असते. पाठ्यपुस्तकाच्या मर्यादा या पृष्ठसंख्येवर अवलंबून असतात. एका पुस्तकात अशी किती माहिती मिळू शकते? तसेच परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी केवळ एका पाठ्यपुस्तकावरच अवलंबून राहून चालत नाही. तसेच, पाठ्यपुस्तकातील माहितीही कोणत्या ना कोणत्या संदर्भ ग्रंथावरून, दुसऱ्या पुस्तकातूनच घेतलेली असते. पाठ्यपुस्तकातून कदाचित समस्येची, प्रश्नाची एकच बाजू समोर येते; परंतु इतर विचार समजतातच असे होत नाही. परीक्षेच्या दृष्टीनेही आपण इतरांपेक्षा जास्त आणि वेगळी काय माहिती देतो आहोत याला अतिशय महत्त्व असते. आपल्या विचारांची पुष्टी करणारे संदर्भ मिळवणे नेहमीच आवश्यक असते. यासाठीच जास्तीची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला माहिती देणाऱ्या अन्य पर्यायाचा शोध घेणे आवश्यक बनते. यासाठी संदर्भ मिळवण्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे. असंख्य स्रोतांमधून आपल्याला आवश्यक तीच माहिती मिळवणे हे ते कौशल्य आहे.

पाठ्यपुस्तकाबरोबरच माहिती मिळवून देणारे असे अनेक स्रोत आहेत. शब्दकोश, थिसॉरस, एन्सायक्लोपिडिया, वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके, ॲटलास, या सर्वांमधून विविध विषयांबाबत आपल्याला जास्तीची माहिती उपलब्ध होऊ शकते. विकिपिडीया, यू-ट्यूब, वेब साइट्स याद्वारेही आपल्याला वेगळे विचार अभ्यासायला मिळतात. रोजचे येणारे वर्तमानपत्र हेही विविध माहितीचा स्रोत असते.

फार पूर्वीपासून ग्रंथालयाचा उपयोग हा अभ्यासू लोकांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण होता. जास्तीत जास्त वाचन करून त्याकाळापासून ज्ञान आत्मसात केले आहे. अलीकडील काळात डिजिटल क्रांतीमुळे विविध पर्याय उपलब्ध झाले असले, तरी ग्रंथांमधून उपलब्ध असणारी माहिती अजूनही महत्त्वाचा संदर्भ म्हणून मानली जाते. यासाठी ग्रंथालयात जाऊन आपल्याला आवश्यक असणारे पुस्तक मिळवणे त्यातील आवश्यक तेवढीच माहिती मिळवणे. योग्य तो संदर्भ ठेवणे व उपयोग करताना त्या संदर्भांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यातून वाङमय चौर्य होऊ नये याची काळजी मात्र घेतली गेली पाहिजे.

स्वतःमधील कल्पनाशक्ती, सर्जनशीलता विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त अवांतर वाचनाला महत्त्व द्यायला हवे. असे वाचन भाषा समृद्धीसाठी उपयोगी ठरते. त्यातूनच आपली स्वतःची अशी भाषा शैली विकसित व्हायला मदत होते. विविध विचारवंतांची मत मतांतरे, विचार समजण्यास मदत होते. विचारांची पुनरावृत्ती टाळता येते. विचारातील नावीन्य दाखवता येते. संदर्भाशिवाय वाचकांचा विश्वास बसत नाही. संदर्भाच्या योग्य वापरानेच आपले मत इतरांना आपण पटवून देऊ शकता. जितके संदर्भ तितके आपले विचार परिपूर्ण होऊ शकतात. संदर्भ कौशल्यामध्ये बिब्लिओग्राफी, इंडेक्स, ॲपेडिस, ग्लोसरी यांचा उपयोग करणे उपयुक्त ठरू शकते. माहिती पटकन कशी, कोणती, कोठे आणि कोणत्या पानावर सापडेल यासाठी कन्टेन्ट इंडेक्स पहाणे आवश्यक आहे. संदर्भ मिळवण्यात जास्त वेळ घालवणे योग्य होत नाही. यासाठी ॲब्रेव्हिएशन्स, शॉर्टफॉर्म यांचा उपयोग कसा केला जातो ते समजून घेणे आवश्यक आहे. आपला अभ्यास परिपूर्ण व्हावा यासाठी असे संदर्भ शोधन अगदी शालेय पातळीपासून करणे मात्र गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT