Career Tips  esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत

ब्रॅंड लहान असो किंवा मोठा आजकाल प्रत्येक कंपनीला त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जाहिरातींची मदत घ्यावी लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : सध्याचे युग हे जाहिरातींचे युग आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत आजकाल सर्वत्र फक्त जाहिरातींचा बोलबाला पहायला मिळतो. त्यामुळे, या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

तुमचा ब्रॅंड लहान असो किंवा मोठा आजकाल प्रत्येक कंपनीला त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जाहिरातींची मदत घ्यावी लागते. यासाठी वाट्टेल तितका पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असते.

त्यामुळे, या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला क्रिएटिव्ह कामाची आवड असेल तर हे क्षेत्र खास तुमच्यासाठी आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून जाहिरात क्षेत्रातील कोर्सेस तुमच्यासाठी एक बेस्ट करिअर ऑप्शन ठरू शकतात. चला तर मग आज आपण जाहिरात क्षेत्रातील कोर्सेसबद्दल जाणून घेणार आहोत.

जाहिरात क्षेत्रातील कोर्सेस कोणते ?

जाहिरात क्षेत्रात आजकाल अनेक प्रकारचे छोटे-मोठे कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थी हे कोर्सेस त्यांच्या गरजेनुसार करू शकतात. जर तुम्हाला यातील छोटे कोर्स करायचे असतील तर तुम्ही डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंगचा कोर्स ही करू शकता.

यासोबतच तुम्ही बॅचलर इन अ‍ॅडव्हर्टायझिंग, डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन, बीएस्सी इन मास कम्युनिकेशन, अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड जर्नालिझम, बॅचलर इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन, मास्टर इन मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम, पीजी डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन, पीजी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन इत्यादी प्रकारचे कोर्सेस या जाहिरात क्षेत्रात उपलब्ध आहेत. जे तुम्ही नक्कीच करू शकता.

कोर्सससाठी पात्रता आणि कौशल्ये

या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम शिकणे आवश्यक आहे. यासाठी, तुम्ही कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १२ उत्तीर्ण असलेले विद्यार्थी जाहिरात क्षेत्रातील डिप्लोमा आणि पदवीला प्रवेश घेऊ शकतात.

मात्र, जर तुम्हाला जाहिरात क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्यूएशन करायचे असेल तर, तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे. जर जाहिरात क्षेत्रात तुम्हाला बॅचलरची पदवी घ्यायची असेल तर ती ३ वर्षांसाठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT