CS Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

CS Exam : सीएस परीक्षांच्या नोंदणीला १९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

कंपनी सेक्रेटरी (सीएस) एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२४ परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

CS Exam : कंपनी सेक्रेटरी (सीएस) एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२४ परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेने (आयसीएसआय) ऑनलाइन नोंदणीसाठी विंडो पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे.

मंगळवारी (ता.१६) जारी केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थी बुधवारी (ता.१७) दुपारी चार ते शुक्रवारी (ता.१९) रात्री १२ पर्यंत नोंदणी करू शकतील. सीएस एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षांच्या नोंदणीसाठी आधी ९ एप्रिल पर्यंत मुदत दिली होती. मात्र, त्यानंतरही नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेने आणखी एक संधी दिली आहे.

या कालावधीत, विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना विलंब शुल्क देखील भरावे लागेल. तसेच आयसीएसने विद्यार्थ्यांना सबमिट केलेल्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी देखील दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (ता.२०) दुरुस्ती विंडो सुरु करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, परीक्षा २ ते १० जून या कालावधीत घेण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagdeep Dhankhar : धनखड हॉस्पिटलमध्ये आहेत की योगा करताहेत? एवढं तरी सांगा; कपिल सिब्बल यांनी अमित शाहांना पुन्हा डिवचले

Early Signs of Dementia: छोट्या-छोट्या गोष्टी विसरत आहात? डिमेन्शियाच्या सुरुवातीच्या या ५ चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका

Ganesh festival २०२५: गणरायाचे स्वागत खड्ड्यातून! 'मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल टिका व आक्रोश; सोशल मीडियावर भावनांचा निचरा

'कॉमन सेन्स नावाची...' ट्राफिकमध्ये अडकल्याने सुमीत राघवन संतापला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला,'शेंगदाणे विकणारा दिसणारा दिसला की...'

Pune News : गणपतीला गावी जाणाऱ्यांच्या प्रवासात विघ्न संपेना, गाड्या कमी; प्रवासी स्वारगेट स्थानकातच....

SCROLL FOR NEXT