Air Force Sakal
एज्युकेशन जॉब्स

वेगळी वाट : छात्रसैनिकांना हवाईदलाचे ‘पंख’

भारतीय हवाईदलात विद्यार्थी व विद्यार्थिनींसह छात्रसैनिकांना हवाईदलाच्या तांत्रिक व प्रशासन विभागात अल्पकालीन व दीर्घकालीन नेमणुकीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

दत्तात्रेय आंबुलकर

भारतीय हवाईदलात विद्यार्थी व विद्यार्थिनींसह छात्रसैनिकांना हवाईदलाच्या तांत्रिक व प्रशासन विभागात अल्पकालीन व दीर्घकालीन नेमणुकीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय हवाईदलात विद्यार्थी व विद्यार्थिनींसह छात्रसैनिकांना हवाईदलाच्या तांत्रिक व प्रशासन विभागात अल्पकालीन व दीर्घकालीन नेमणुकीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता - अर्जदार १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत अथवा ते या पात्रता परीक्षेला बसलेले असावेत.

  • विशेष सूचना - वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय जे विद्यार्थी वा विद्यार्थिनी छात्रसेनेची पात्रताधारक असतील त्यांना हवाईदलाच्या छात्रसेना विशेष निवड योजनेअंतर्गत विशेष संधी उपलब्ध असेल.

  • शारीरिक पात्रता - वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत.

  • वयोमर्यादा - अर्जदारांचे वय १ जुलै २०२३ रोजी २० ते २४ वर्षांच्या दरम्यान असावेत व त्यांचा जन्म २ जुलै १९९९ ते १ जुलै २०२३ च्या दरम्यान झालेला असावा.

  • निवड पद्धती - अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावर निवड परीक्षा घेण्यात येईल. वरील निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने व एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट व एनसीसी स्पेशल एन्ट्री टेस्ट या स्वरूपात घेण्यात येईल. संगणकीय पद्धतीने घेण्यात येणाऱ्या वरील निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना हवाईदलातर्फे शारीरिक चाचणी, मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.

  • अर्जासह भरावयाचे शुल्क - अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून २५० रुपये संगणकीय पद्धतीने भरणे आवश्‍यक आहे.

  • नेमणूक कालावधी व तपशील - योजनेअंतर्गत हवाईदलात निवड झालेल्या उमेदवारांची अधिकारी पदावर नेमणूक करण्यात येईल. यापैकी अल्पकालीन कालावधीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नेमणुकीचा कालावधी १० वर्षे असेल.

  • वेतनश्रेणी व फायदे - निवड झालेल्या उमेदवारांना हवाईदलाच्या विविध विभागांमध्ये अधिकारी पदावर ५६,१०० ते १,७७,५०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. वरील वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना हवाईदलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे व पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील.

  • अधिक माहिती व तपशील - बारावी उत्तीर्ण व विशेषतः छात्रसेना पात्रतेसह असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ वा ‘रोजगार समाचार’च्या २८ मे ते ३ जून २०२२ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय हवाईदलाची जाहिरात पाहावी अथवा हवाईदलाच्या https://carcerindianairforce.cdac.in अथवा https://afcat.cdac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख - संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT