Naval dock sakal
एज्युकेशन जॉब्स

दिशा उद्याची : नौदल गोदी, मुंबई येथे मोठ्या संधी

नौदल गोदी, मुंबई येथे आयटीआय प्रशिक्षित उमेदवारांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.

दत्तात्रेय आंबुलकर

नौदल गोदी, मुंबई येथे आयटीआय प्रशिक्षित उमेदवारांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.

नौदल गोदी, मुंबई येथे आयटीआय प्रशिक्षित उमेदवारांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.

उपलब्ध जागांची संस्था व तपशील

एकूण उपलब्ध जागा - ३०३

यापैकी ३० जागा अनुसूचित जातीच्या, २३ जागा अनुसूचित जमातीच्या, ५४ जागा इतर मागासवर्गीय, ७ जागा दिव्यांगांसाठी तर ८ जागा माजी सैनिकांच्या मुलांसाठी राखीव असून १८१ जागा खुल्या वर्गाच्या उमेदवारांसाठी उपलब्ध आहे.

आवश्यक पात्रता -

अर्जदारांनी दहावीची परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रोप्लेटर, मरिन इंजिन फिटर, फाउंड्री मॅन, सुतारकाम, पॅटर्न मेकर, डिझेल मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स, पेंटर, शीट मेटल वर्कर, प्लंबर, एसी मेकॅनिक, ड्रेस मेकिंग, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मॅसन यासारख्या विषयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.

वयोगट व शारीरिक पात्रता -

अर्जदारांचा जन्म १ ऑगस्ट २००१ ते ३१ ऑक्टोबर २००८च्या दरम्यान झालेला असावा. तसेच उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावेत.

निवड प्रक्रिया -

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना नौदल गोदी, मुंबईतर्फे ऑगस्ट २०२२मध्ये लेखी निवड परीक्षेसाठी बोलविण्यात येईल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

प्रशिक्षण कालावधी -

प्रशिक्षणार्थींच्या एका वर्षाच्या कालावधीसाठी दरमहा त्यांना दरमहा सहा हजार रुपये इतके पाठ्यवेतन देण्यात येईल.

अधिक माहिती व तपशील -

यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी, एम्प्लॉयमेंट न्यूज अथवा रोजगार समाचारच्या १८ ते २४ जून २०२२ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल गोदी मुंबईची जाहिरात पाहावी. किंवा नौदल गोदीच्या https://dasapprenticembi.recttindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख -

ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२२ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT