Dattatreya Ambulkar writes Course of Information Technology and Electronics sakal
एज्युकेशन जॉब्स

माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम

राष्ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान संस्था, हरिद्वार येथे उपलब्ध असणाऱ्या खालील विशेष अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

दत्तात्रेय आंबुलकर

राष्ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान संस्था, हरिद्वार येथे उपलब्ध असणाऱ्या खालील विशेष अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान संस्था, हरिद्वार येथे उपलब्ध असणाऱ्या खालील विशेष अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अकाउंटिंग अँड पब्लिशिंग

  • अभ्यासक्रमाचा कालावधी : ५ महिने

  • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावी.

सर्टिफिकेशन कोर्स इन डेटा एंट्री अँड ऑफिस ऑटोमेशन

  • अभ्यासक्रमाचा कालावधी : ४ महिने

  • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत व त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ५० टक्के असावी.

  • उपलब्ध जागांची संख्या : वरील दोन्ही उपलब्ध अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांची संख्या प्रत्येकी ३० असून, त्यापैकी २० जागा राखीव गटातील उमेदवारांसाठी आहेत.

  • निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांनी ‘प्रथम आलेल्यास प्रथम’ या आधारे संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येऊन त्यानुसार त्यांना प्रवेश देण्यात येईल.

  • उपलब्ध रोजगार संधी : वरील अभ्यासक्रम यशस्वीपणे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयातील प्रमाणपत्र देण्यात येईल.

  • संगणकीय कार्यपद्धती व माहिती-तंत्रज्ञानाचा वाढता व्यावसायिक वापर यामुळे वरील पात्रताधारक उमेदवारांना आर्थिक-औद्योगिक वा सेवा क्षेत्राशिवाय बीपीओसारख्या क्षेत्रातही रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात.

अधिक माहिती व तपशील : वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ वा ‘रोजगार समाचार’च्या १४ ते २० मे २०२२ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान संस्था, हरिद्वारची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या https ://nielit.gov.in/ haridwar/content/howtoregister या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर प्रवेश अर्ज करण्याची तारीख ११ जून २०२२ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT