NEP Autonomous Colleges
NEP Autonomous Colleges sakal
एज्युकेशन जॉब्स

NEP Autonomous Colleges : प्रथम नव्हे, द्वितीय वर्षाला मुख्य विषय ; स्वायत्त महाविद्यालयांतील ‘एनईपी’च्या आढाव्यानंतर सुकाणू समितीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (एनईपी) पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच मुख्य (मेजर) आणि ऐच्छिक (मायनर) विषय निवडण्याची तरतूद केली होती. मात्र स्वायत्त महाविद्यालयांतील अंमलबजावणीचा आढावा घेतल्यानंतर सुकाणू समितीने त्यात महत्त्वपूर्ण बदल सुचविला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाऐवजी द्वितीय वर्षाला मुख्य विषय निवडता येणार आहे.

सुकाणू समितीच्या निर्णयामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्याच वर्षी मुख्य विषय निवडल्यामुळे काही प्राध्यापकांच्या नोकरीवर येणारी गदा टळली आहे. राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांत सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासूनच ‘एनईपी’ची अंमलबजावणी केली होती. त्यांना येणाऱ्या अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिसादासंदर्भात आढावा घेतला होता. त्यात बहुतांश महाविद्यालयांनी प्रथम वर्षांपासूनच विद्यार्थ्यांना मुख्य विषय निवडण्याची संधी देऊ नये. हा नियम विद्यार्थ्यांना जाचक ठरत आहे. त्याचप्रमाणे केवळ दोन विषयांना विद्यार्थी अधिक पसंती देत आहेत.

एका विषयास विद्यार्थी मिळत नसल्याने एका विषयाचे प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात बदल करावा अशी विनंती केली होती. त्यानुसार सुकाणू समितीने बदल केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून संलग्न महाविद्यालयांत ‘एनईपी’ची अंमलबजावणी होईल. नव्या निर्णयामुळे प्रथम वर्षाच्या प्रवेशातील गोंधळ काहीसा टळणार आहे. या संदर्भात राज्याचे उप सचिव ए. एम. बाविस्कर यांनी १३ मार्चला परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थी द्वितीय वर्षापासून मुख्य विषय निवडू शकतील.

प्रथम वर्ष पूर्वीप्रमाणे

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्षात पूर्वीप्रमाणेच विषय निवडता येतील. द्वितीय वर्षात मुख्य विषय निवडण्याची संधी दिली जाईल. प्रथम वर्षात निवडलेल्यांपैकी एक विषय द्वितीय वर्षात मुख्य विषय म्हणून निवडा येईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मुळातच लवचिक आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार शैक्षणिक हिताचे निर्णय स्वायत्त महाविद्यालयांना घेता येतात. महाविद्यालयांतील प्रथम वर्षाच्या आढाव्यानंतरच द्वितीय वर्षापासून मुख्य विषय निवडण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वर्षीच विद्यार्थ्यांना मुख्य विषय देऊ नये. त्यांना विचार करण्यास वेळ मिळावा, असे स्वायत्त महाविद्यालयांचे म्हणणे होते.

- डॉ. नितीन करमळकर, अध्यक्ष, राज्य सुकाणू समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT