Ramnath Kovind esakal
एज्युकेशन जॉब्स

'ती' घटना घडली नसती, तर जनरल रावत आमच्यासोबत असते : राष्ट्रपती

सकाळ डिजिटल टीम

'रावतांच्या निधनानं झालेली हानी कधीही भरून निघणार नाही. ही घटना घडली नसती, तर..'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी आज (शनिवार) डेहराडूनमधील इंडियन मिलिटरी अकादमीच्या (Indian Military Academy) कॅडेट्सना संबोधित केलं. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना आदर्श मानून जवानांनी त्यांच्या कार्याचं स्मरण करावं, असं आवाहन कोविंद यांनी केलं. राष्ट्रपती आयएमएच्या पासिंग आऊट परेडमध्ये (IMA Passing Out Parade) विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

जनरल बिपीन रावत यांचं लष्करी लिडर म्हणून वर्णन करताना राष्ट्रपती म्हणाले, रावतांच्या निधनानं झालेली हानी कधीही भरून निघणार नाही. ही घटना घडली नसती, तर आज पासिंग आऊट परेडमध्ये जनरल रावत आमच्यासोबत असते. राष्ट्रपती कोविंद यांच्यासह जनरल रावत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी आयएमए डेहराडूनमधून पदवी घेतलीय. त्यांना अकादमीत सर्वोत्कृष्ट स्वॉर्ड ऑफ ऑनरनं सन्मानित करण्यात आलंय. तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत व त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांना प्राण गमवावे लागले.

शनिवारी 319 तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले. उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) सर्वाधिक 45 तर उत्तराखंडमधून (Uttarakhand) 43 तरुण सैन्यात भरती झाले. यासह 68 कॅडेटही उत्तीर्ण झाले आहेत. आयएमए डेहराडूनमधून आज एकूण 387 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या तरुणांना संबोधित करताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले, तुमचं प्रशिक्षण तुम्हाला प्रत्येक आव्हानांसाठी तयार करतं. आमचा ध्वज सदैव उंच राहील, कारण जनरल बिपीन रावत यांच्यासारखे धाडसी तरुण, ज्यांना आयएमएमध्ये प्रशिक्षण मिळालंय. ते नेहमीच आपल्या सन्मानाचं रक्षण करतील, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT