Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

डिप्लोमा, जेओसी, आयटीआय हे बारावी समान

शासनाने याबाबत नुकताच आदेश बजावला आहे

विनायक जाधव

बेळगाव - डिप्लोमा हा विषय पदवीपूर्व शिक्षणाला समान की नाही? गोंधळ अखेर शासनाने दूर केला आहे. डिप्लोमा, जॉब ओरिएंटेड कोर्स (जेओसी) आणि आयटीआय याला बारावीत समान, असे गृहीत धरले असून शासनाने याबाबत नुकताच आदेश बजावला आहे.‌

डिप्लोमा, जेओसी, आयटीआय शैक्षणिक पात्रता पात्रता ही बारावी प्रमाणे गृहीत धरली जावी आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सेवेत सामावून घ्यावे, असा आदेश प्रशासकीय खात्याच्या मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालकांना लेखी स्वरुपात बजावला आहे. त्यामुळे इतर शासकीय खात्याना देखील हा नियम लागू होणार आहे.‌ तांत्रिक शिक्षण खात्याचे तीन वर्षाचे डिप्लोमा कोर्स आता बारावी म्हणून गृहीत धरले जाणार आहे. २०१५ पूर्वी डिप्लोमा झालेले विद्यार्थ्यांना कर्नाटक लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत कन्नड भाषा सक्तीची होती. पण आता डिप्लोमा आहे 12 वी समान असे गृहीत धरण्यात आल्याने ही सक्ती देखील नाहीशी होणार आहे.

पोलीस कॉन्स्टेबल पदाला बारावी आणि तत्समान शिक्षण शैक्षणिक पात्रता म्हणून घोषित करण्यात आले आहे. कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेला उमेदवार के.पी. दीप याने कम्प्युटर सायन्स विषयात तीन वर्षाचा डिप्लोमा केला होता. पण पोलीस दलाने बारावी किंवा तत्समान शिक्षण हवे म्हणून त्याची नियुक्ती थांबवली होती. त्यामुळे श्री दीप याने अखेर शासनाकडे यासंबंधी दाद मागितली त्याची दखल घेत हा नवा आदेश बजावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT