महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड अभ्यासक्रमाच्या मे २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.
पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड अभ्यासक्रमाच्या मे २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. परिषदेच्या ‘www.mscepune.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील सहा हजार ३४१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यातील ५७.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
डी.एल. एड अभ्यासक्रमासाठी राज्यातील सहा हजार ४५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील सहा हजार ३४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील तीन हजार ६९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा पाच माध्यमांमध्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत हस्तपोच मिळणार आहे. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.
निकालाची वैशिष्ट्ये :
माध्यम : नोंदणी केलेले विद्यार्थी : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थी
मराठी : ४,६४७ ४,५५८ २,५५९
उर्दू : ८५६ ८५० ५४९
हिंदी : १७७ १७४ १११
इंग्रजी : ७६३ ७४३ ४५९
कन्नड : १६ १६ १५
एकूण : ६,४५९ ६,३४१ ३,६९३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.