अभियांत्रिकीचा निकाल तत्काळ लावण्याचे आदेश  sakal news
एज्युकेशन जॉब्स

अभियांत्रिकीचा निकाल तत्काळ लावण्याचे आदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्याकडून अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची हिवाळी २०२० परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अभियांत्रिकीचा निकाल तत्काळ लावण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश तंत्र शिक्षण उपसंचालक संदीप तडस यांनी मंगळवारी (ता.२८) कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांना दिले आहेत. याबाबत नुकतेच ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्‍ध झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्याकडून अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची हिवाळी २०२० परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती. परीक्षा संपून तब्बल ७५ दिवस उलटून गेले तरीही विद्यापीठातर्फे या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. विद्यापीठ कायद्यान्वये परीक्षेनंतर ४५ दिवसात निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली असल्याने प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासणी, साक्षांकित प्रती वितरित करणे, किंवा उत्तर पत्रिकांचे पूर्वावलोकन करण्याचे काम विद्यापीठाला करावे लागत नव्हते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही तंत्रशास्त्र विद्यापीठाचे निकाल अडीच महिन्यातही जाहीर करू शकत नसेल तर राज्यातील इतर विद्यापीठाबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय निकाल लागण्यास विलंब होत असताना या बाबतीत विद्यापीठ आपल्या संकेतस्थळावर एखादी सूचना प्रसारित करून विद्यार्थ्यांना विश्‍वासात घेण्याचाही प्रयत्न करताना दिसत नाही, हे विशेष. विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म वेळेवर न भरल्यास त्यांना दंड आकारला जातो. मग परीक्षेचे निकाल वेळेवर लागत नसतील तर तसाच दंड विद्यापीठाकडून वसूल करून तो विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याकडे केली होती. याप्रकरणी अभियांत्रिकीचा निकाल तत्काळ लावण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश तंत्र शिक्षण उपसंचालक संदीप तडस यांनी कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT