Brain Machine
Brain Machine Sakal
एज्युकेशन जॉब्स

हेल्थ केअर : ब्रेन मशिन इंटरफेस : भविष्य आणि संधी

डॉ. नानासाहेब थोरात saptrang@esakal.com

मागील आठवड्यातील लेखामध्ये आपण ब्रेन मशिन इंटरफेस या तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली. या लेखामध्ये आपण या तंत्रज्ञानाचे भविष्य आणि त्यामधील संधी पाहूया.

मागील आठवड्यातील लेखामध्ये आपण ब्रेन मशिन इंटरफेस या तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली. या लेखामध्ये आपण या तंत्रज्ञानाचे भविष्य आणि त्यामधील संधी पाहूया.

इतर मेडिकल तंत्रज्ञानाच्या तुलनेत ब्रेन मशिन इंटरफेस नावीन्यपूर्व कल्पना असून भविष्यात हे व्यवहार्य जगात वेगाने वापरले जाईल. हे तंत्रज्ञान फक्त रुग्णालयात न राहता डॉक्टरांच्या विशेष वैद्यकीय उपचारांच्या पलीकडे वापरले जाईल. या तंत्रज्ञानाच्या जोडीला वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स सारखी उपकरणे ब्रेन सेन्सर तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील जिथे वापरकर्ता डिव्हाइस नियंत्रित करण्यासाठी ‘एंटर’ आणि ‘डिलीट’ सारख्या सोप्या आदेशांचा विचार करू शकेल.

सध्या रुग्णालयात ईईजी तसेच एमआरआयसारखे तंत्रज्ञान मेंदूच्या आजारांचे निदान करण्यासाठी वापरले जाते. याउलट मेंदूच्या वेगेवेगळ्या आजारणावर मात्र औषधांचाच वापर केला जातो. ही औषधे पूर्णतः मेंदूचे आजार बरे करत नाही. याउलट ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस हा कमी आक्रमक पर्याय आपल्या मेंदूच्या लहरींची नोंद करणारे एक बाह्य उपकरण असेल. हे आता वापरात असलेल्या ईईजी, इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी, किंवा ईईजी, कदाचित एमआरआय याहीपेक्षा वेगळे असेल. त्याचबरोबर न्यूरल क्रियाकलाप रेकॉर्ड करण्यासाठी दुसरे-सर्वोत्तम उपकरण असेल.

करिअरच्या संधी

हे सध्या बाल्यावस्थेत असणारे क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असणार आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, मेडिकल डॉक्टर्स, परिचारिका आणि मेडिकल उपकरणे तयार करणारे उद्योजक याना या क्षेत्रात नवीन उपलब्ध होतील.

छोट्या स्वरूपातील उपकरणांचे संगणकीय प्रोग्रॅम तयार करणे आणि त्यांना मानवी संवेदनांचे स्वरूप देणे हे नवीन क्षेत्र उदयास येईल, यामध्येही वरील सर्व कौशल्य असणाऱ्या तरुणांना संधी निर्माण होतील.

हे तंत्रज्ञान मानवी विचार शारीरिक क्रिया संगणक प्रतिसाद यांच्यातील अंतर दूर करेल. त्यामुळे एखाद्या तरुण इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील कौशल्ये असतील तर त्यांना या क्षेत्रात संधी निर्माण होतील.

विद्यापीठांना नवीन अभ्यासक्रमाच्या संधी

सध्या भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याचे नियोजन सुरू आहे. त्याचजोडीला भारतमध्ये दर महिन्याला एक नवीन खासगी विद्यापीठ उभे राहत आहे. या स्पर्धेच्या युगात अनेक खासगी आणि सरकारी विद्यापीठांना नवनवीन अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यामधून विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी निर्माण करणे अशा दोन्ही आव्हानांवर काम करावे लागणार आहे. ज्याप्रमाणे इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजीचे युग आले त्याचप्रकारे भविष्यात अनेक विद्यापीठांमध्ये ब्रेन-मशीन इंटरफेस या तंत्रज्ञानावर आधारित नवीन अभ्यासक्रम तयार करता येतील. त्याचजोडीला ज्या विद्यापीठांमध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल ही दोन्ही अभ्यासक्रम आहेत त्यांना या संधीचा फायदा लगेच घेता येईल. ही दोन्ही क्षेत्रे एकत्र करण्याचे आव्हान शैक्षणिक संस्थांना पेलता आल्यास या क्षेत्रात फक्त नवीन कौशलेच नाही तर त्यावर आधारित नोकरीच्या लाखो संधी निर्माण करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT