Health Economics Syllabus Sakal
एज्युकेशन जॉब्स

हेल्थ केअर : हेल्थ इकॉनॉमिक्समधील अभ्यासक्रम

मागील लेखामध्ये आपण हेल्थ इकॉनॉमिक्स या नवीनच विकसित होणाऱ्या या क्षेत्रात कशा प्रकारच्या करियरच्या संधी उपलब्ध होतील आणि या क्षेत्राचे भविष्यातील स्वरूप कसे असेल याची माहिती घेतली.

डॉ. नानासाहेब थोरात saptrang@esakal.com

मागील लेखामध्ये आपण हेल्थ इकॉनॉमिक्स या नवीनच विकसित होणाऱ्या या क्षेत्रात कशा प्रकारच्या करियरच्या संधी उपलब्ध होतील आणि या क्षेत्राचे भविष्यातील स्वरूप कसे असेल याची माहिती घेतली.

मागील लेखामध्ये आपण हेल्थ इकॉनॉमिक्स या नवीनच विकसित होणाऱ्या या क्षेत्रात कशा प्रकारच्या करियरच्या संधी उपलब्ध होतील आणि या क्षेत्राचे भविष्यातील स्वरूप कसे असेल याची माहिती घेतली. या लेखात आपण जगभरातील अनेक संस्थांनी अशा प्रकारचे नावीन्यपूर्वक अभ्यासक्रम कसे सुरू केले आहेत आणि त्यामधून कशा प्रकारची रोजगाराची संधी निर्माण झाली ते पाहूया. जगभरात हेल्थ इकॉनॉमिक्स हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये युरोपमधील विद्यापीठे आघाडीवर आहेत. ब्रिटनमधील लंडन हे युरोपचे आहे, जगाचे एक आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. लंडन आणि आसपासच्या शहरातील जवळपास ६५ विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम मागील तीन वर्षांमध्ये सुरू केला आहे. यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, किंग्स कॉलेज लंडन, ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठ यांचा समावेश आहे. याही पुढे जाऊन इंग्लंडमधील नॉटिंगम विद्यापीठाने चीनमध्ये त्यांचा कॅम्पस सुरू करून चीनमधील पहिला हेल्थ इकॉनॉमिक्समधील अभ्यासक्रम सुरू केला आहे. इतर युरोपियन देशांचा विचार केला तर जर्मनी, इटली, नेदरलँड, स्पेन याबरोबर इतर देशांमध्ये ३००पेक्षा अधिक विद्यापीठांनी कोरोनानंतर हा अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुरू केला आहे. अमेरिकेतील २५ पेक्षा अधिक विद्यापीठे हा अभ्यासक्रम सध्या चालवत असून यामध्ये जगप्रसिद्ध हार्वर्ड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेचाही समावेश आहे.

भारताचा विचार केला तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अगदी बोटावर मोजण्या एव्हढ्याच शैक्षणिक संस्थाच हा अभ्यासक्रम चालवत आहेत. यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि दिल्ली, बंगळूर आणि पुण्यातील काही खासगी संस्था आहेत. काही संस्था ऑनलाइन पद्धतीने हा अभ्यासक्रम चालवत असून त्याच्याबद्दलची माहिती या क्षेत्रातील फार कमी विद्यार्थ्यांना आहे.

अशा प्रकारचा नवीन अभ्यासक्रम शिकून विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या करियरच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

  • ब्रिटनमधील अनेक विद्यापीठांमधून हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ब्रिटनच्या सरकारी आरोग्य सेवेत नोकरी मिळाली आहे. त्यासाठी सरकारी आरोग्य सेवेत काही नवीन पदे निर्माण केली गेली याचा फायदा विद्यार्थ्यांना आणि आरोग्य यंत्रणेलाही झालेला दिसून येत आहे.

  • याच मॉडेलवर आधारित कोरोनानंतर अनेक युरोपियन देशांनी सरकारी आणि खासगी आरोग्य यंत्रणेमध्ये हेल्थ इकॉनॉमिक्स या संकल्पनेची भर घालत आहेत.

  • फक्त सरकारी आरोग्य यंत्रणेतच नाही तर स्वतःची स्टार्ट-अपही सुरू करता येते. जगातील मोठमोठ्या इकॉनॉमिक हब असणाऱ्या शहरांमध्ये अशा प्रकारची स्टार्ट-अप सुरू झाली आहेत. यामध्ये लंडन, टोकियो, फ्रँकफर्ट, बंगळूर, न्यूयॉर्क, हॉँगकॉँग यांचा समावेश आहे.

  • या स्टार्ट-अप कंपन्या आरोग्य विमा पुरवणाऱ्या कंपन्या, खासगी किंवा सरकारी रुग्णालयांना सल्ला देण्याचे कार्य करतात. त्याचबरोबर लोकांनाही त्यांच्या भविष्यातील आरोग्याचे नियोजन करण्याचा सल्ला देतात.

  • याचबरोबर काही पदवीधर वैयक्तिक स्वरूपाचेही व्यवसाय सुरू करू शकतात. अशा प्रकारचे हेल्थ सल्लागार म्हणून अनेक युरोपियन देशांमध्ये करियरच्या संधी निर्माण होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT