मी २००४ मध्ये पुण्यातील एका कंपनीसाठी बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी जपानला गेले, तेव्हा मला खूप मदत झाली ती जेट्रोची (JETRO - JAPAN EXTERNAL TRADE ORGANIZATION). त्यांच्या सहकार्यामुळे मला बिझनेस प्लॅन लिहिण्यासाठी वेगवेगळ्या कन्सल्टिंग कंपन्यांच्या प्रतिनिधींची माहिती मिळाली आणि काम करणे सोपे झाले. जपानमध्ये नवीन व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.
जेट्रोद्वारे होणारी मदत
व्यवसाय वाढविण्यासाठी बाजारपेठेची माहिती, भांडवल किती असावे, अनुदान कुठे मिळू शकते, स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांची माहिती आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांशी मीटिंग करून देणे. जेणेकरून गुंतवणूक सुलभ होईल.
जपानमधील वेगवेगळ्या करांविषयीची माहिती.
जपानमधील कामगार आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ यांच्यासंबंधातील कायदे यांची माहिती.
न्यायालयीन माहिती, वकील, कर अकाउंटंट आणि सामाजिक विमा कामगार अशा परदेशी संबद्ध कंपन्यांना विनामूल्य आधार देण्याचा व्यापक अनुभव असलेल्या व्यावसायिकांना संदर्भ देणे.
परवाना (license) आणि मंजुरीसाठी प्रशासकीय प्रक्रियेस मदत मिळते.
टोकियो, योकोहामा, नागोया, ओसाका, कोबे आणि फुकुओका या सहा शहरांमध्ये मोफत ऑफिससाठी लहान जागा मर्यादित दिवसांसाठी मिळते.
जपानमध्ये गुंतवणूक करण्याची कारणे :
जगातील क्रमांक तीनची अर्थव्यवस्था.
कमाईची क्षमता जास्त.
व्यावसायिक कर कमी.
सरकारकडून ‘एफडीआय’चे स्वागत करते.
‘जेट्रो’च्या शाखा जगभर आहेत. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळूर आणि चेन्नईमध्ये शाखा आहेत. या शाखांमध्ये संपर्क केल्यास जपानमध्ये व्यवसाय करण्यासाठी लागणारी मूलभूत माहिती मिळते.
‘जेट्रो’ची एक बीजेटी (BJT - BUSINESS JAPANESE TEST) आहे. यामध्ये जपानमध्ये व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या जपानी भाषेची परीक्षा घेतली जाते. जपानबरोबर व्यवसाय करायचा असलेल्यांनी या परीक्षेचा विचार नक्की करावा. जपानला ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळखले जाते आणि या देशामध्ये वेगवेगळ्या उच्चप्रतीच्या उत्पादनांसाठी मोठ्या संधी आहेत.
सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.