Tourism
Tourism Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर अपडेट : खुणावतात निसर्गाच्या वाटा..!

सकाळ वृत्तसेवा

‘अतुल्य भारत’ ही भारत सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या आणि प्रसाराच्या उद्देशाने चालवलेली मोहीम आहे.

- डॉ. वंदना जोशी

‘अतुल्य भारत’ ही भारत सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या आणि प्रसाराच्या उद्देशाने चालवलेली मोहीम आहे. ‘अतुल्य भारत’ ही संकल्पना फक्त भारतीय संस्कृती, येथील निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे यापुरतेच मर्यादित नाही, तर व्यापक संकल्पना असून त्यात जैवविविधतेचाही समावेश आहे. भारताचा १ लाख १४ हजार किलोमीटर एवढा प्रदेश वन्यजीव, वने यासाठी राखीव आहे. जगभरात सहलीसाठी जाण्यामागचे मुख्य कारण म्हणजे वाइल्ड लाईफचा अनुभव घेणे. विविध प्रकारच्या वनस्पती, अरण्ये आणि प्राण्यांच्या प्रजातींमुळे भारताला जैविक राजधानी म्हटले तर वावगे ठरणार नाही. निसर्गप्रेमी, फोटोग्राफर, वाइल्ड लाइफ प्रेमी, हनीमूनर हे वाइल्ड लाइफ पर्यटनासाठी जाणारे मुख्य पर्यटक आहेत. भारतात १०६ राष्ट्रीय उद्याने आणि ५६४ वन्यजीव अभयारण्ये आहेत. त्यातील सात अभयारण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

भारतातील राष्ट्रीय उद्यानात व अभयारण्यात वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांची वाढ होत असल्याने भारतात वाइल्ड लाइफ पर्यटनाला चालना मिळत आहे. जवळपास १५ टक्क्यांनी पर्यटन संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः भारतीयांना वाइल्ड लाइफचे खूप आकर्षण असल्याने ७० टक्के पर्यटक भारतीयच आहेत. वाइल्ड लाइफ पर्यटनामध्ये पर्यटक त्यांच्या आवडीच्या राष्ट्रीय उद्यानात, अभयारण्यात सहलीसाठी जातात. तेथील निसर्गरम्य वातावरणात मुक्काम करून सकाळी, सायंकाळी सफारी घेऊन, अभयारण्यातील वन्यप्राणी, पक्षी व वनस्पतींचा अनुभव घेतात. या सहलीमध्ये त्यांना खूप शिकायला मिळते. पर्यटकांच्या भेटीमुळे अभयारण्याचा विकास होतो. त्याचबरोबर परिसरातील लोकांना रोजगार मिळतो. या मिळणाऱ्या रोजगारामुळे वन्यजीवांचे शिकारीपासून संरक्षण होत आहे.

पर्यटनाच्या मूलभूत माहितीसाठी डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम किंवा पर्यटनाशी संबंधित इतर कोणताही अभ्यासक्रम यासाठी उपयोगी ठरतो. यामध्ये ट्रॅव्हल एजन्सी व्यतिरिक्त ट्रीप लीडर, वाइल्ड लाइफ कॅम्प, वाइल्ड लाइफ टूर प्लॅनर, वाइल्ड लाइफ ट्रॅव्हल अँड डॉक्युमेंटरी फोटोग्राफर म्हणून काम करता येते.

आवश्यक कौशल्ये

  • निसर्गाची आवड

  • पर्यटन परिसराचे परिपूर्ण ज्ञान, उदा. मुख्य वाइल्ड लाइफ, पर्यटनासाठीचा उत्तम काळ, राहण्याची व वाहतुकीची व्यवस्था. याबाबतची माहिती असावी.

  • भाषेवर प्रभुत्व

  • वाइल्ड लाइफ बद्दलची उत्सुकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT