दृष्टिहीन मोनिकाचे नेत्रदीपक यश! बॅंकेत लिपिक पदापर्यंत मारली मजल Sakal
एज्युकेशन जॉब्स

दृष्टिहीन मोनिकाचे नेत्रदीपक यश! बॅंकेत लिपिक पदापर्यंत मारली मजल

जिद्दीच्या जोरावर दृष्टिहीन मोनिकाचे नेत्रदीपक यश! सरकारी बॅंकेत लिपिक पदापर्यंत मारली मजल

श्रावण तीर्थे

जन्मतःच अंध असलेल्या मोनिका रणदिवे हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवत बॅंक ऑफ इंडिया, पुणे येथे लिपिक पदापर्यंत मजल मारली आहे.

कोरवली (सोलापूर) : कामती बु. (ता. मोहोळ) (Mohol) येथील रणदिवे वस्ती येथील जन्मतःच अंध असलेल्या मोनिका सावळाराम रणदिवे (Monica Randive) हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवत बॅंक ऑफ इंडियाच्या (Bank of India) मीरा नगर, कोरेगाव पार्क, पुणे (Pune) येथे लिपिक पदापर्यंत मजल मारली आहे. मोनिका हिचा जन्म शेतकरी कुटुंबातील असला तरी तिचे वडील व भाऊ प्राथमिक शिक्षक असल्या कारणाने तिला घरच्यांकडूनच शिक्षणाचा वारसा लाभला.

घरच्यांनी तिला प्राथमिक शिक्षणासाठी सोलापूर येथील राजीव गांधी मेमोरियल स्कूल या अंधशाळेत ब्रेल लिपीतून शिक्षण घेण्यासाठी पाठवले. सुरवातीला तिला शिक्षण घेताना सर्व काही नवीन व अनोळखी वाटत असल्याने घरच्यांना व तिला देखील सुरवातीचे काही दिवस खूप अवघड गेले; मात्र मोनिकाने कसल्याही परिस्थितीत उच्च शिक्षण घ्यायचेच, अशी मनाशी खूणगाठ बांधली. तिला हे प्राथमिक शिक्षण घेताना तिची मोठी अंध बहीण अश्विनीची खूप मोलाची मदत झाली.

शाळेच्या वसतिगृहात राहून या दोन्ही अंध बहिणींनी शिक्षण घेतले. सोलापूर येथून पुढे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी मोनिकाने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रवेश घेतला. तिथे तिने दहावीच्या परीक्षेत 73.09 टक्के गुण मिळवले. पुढे पुण्यातील वाडिया कॉलेजमधून तिने बारावीला 72.76 टक्के इतके गुण प्राप्त केले. अर्थशास्त्र हा विषय घेऊन तिने बीएची पदवी प्राप्त केली आहे. तसेच संगणकाचे ज्ञान मिळवण्यासाठी तिने एमएस-सीआयटीचा कोर्सही केला आहे. लिपिक पदावर नियुक्ती होण्याआधी मोनिकाने पुण्यातील एका नामांकित एनजीओमध्ये सलग पाच वर्षे टेक्‍निकल विभागाची प्रमुख म्हणून नोकरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल कामती पंचक्रोशीत तिचे कौतुक केले जात आहे.

शिक्षण घेत असताना मला माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी प्रोत्साहन दिले. विशेष करून माझ्या अंध मामांनी मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. परीक्षेतील लिखाण करण्यासाठी व मी सांगितलेली उत्तरे लिहिण्यासाठी रायटरची खूप मोलाची मदत झाली असून, रायटरमुळेच मी इथंपर्यंत पोचू शकले. मी रायटरचे व कुटुंबातील सर्वच सदस्यांचे आभार मानते.

- मोनिका रणदिवे, लिपिक, बॅंक ऑफ इंडिया, मीरानगर, कोरेगाव पार्क शाखा, पुणे

दोन्ही मुली अंध असताना खचून न जाता त्यांना स्वावलंबी कसे बनवता येईल, या एकाच उद्देशाने त्यांना चांगले व उच्चशिक्षण द्यायचे असे मी ठरवले होते. माझ्या दोन्ही मुलींनीही माझी इच्छा पूर्ण केली असून, एक मुंबईतील एका रुग्णालयात नर्स म्हणून सेवा बजावत आहे तर दुसरी मुलगी पुणे येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत लिपिक पदावर नोकरी करत आहे, यातच माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे.

- सावळाराम रणदिवे, मोनिकाचे वडील, सेवानिवृत्त शिक्षक, कामती बु, ता. मोहोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: काव्या मारनची परफेक्ट चॉईस! 30 लाखाच्या गोलंदाजाने भल्याभल्यांना नाचवले; IPL 2026 नक्कीच गाजवणार

फॉरेनर बायकोचा हट्ट पडलेला बॉलिवूड अभिनेत्याला महागात; परदेशी स्त्रीसोबतच्या लिव्ह इनने झाला पश्चाताप

Latest Maharashtra News Updates Live: राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, शिवसेनेच्या प्रकाश महाजन यांची टीका

Dharashiv News : इमारत तयार, पण सुविधा अद्याप बंद; येरमाळ्यात शासकीय विश्रामगृह ३ वर्षांपासून लोकार्पणाविना!

Jalgaon Municipal Election : जळगावचा 'पहिला नागरिक' कोण? महापौर आरक्षणाची टांगती तलवार, उमेदवारांच्या काळजाची धडधड वाढली

SCROLL FOR NEXT