TET Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

TET Exam : टीईटी उत्तीर्णसाठी मुदतवाढ; शिक्षकांना आता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांऐवजी मिळणार 5 वर्षे

Education Department : शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांऐवजी पाच वर्षे मिळणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिक्षण विभागाने तीन वर्षांऐवजी पाच वर्षांची मुदत देण्यामागील नेमके कारण शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले नाही.

शिरोली पुलाची : राज्यात अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने (Education Department) घेतला आहे. यानुसार शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांऐवजी पाच वर्षे मिळणार आहेत.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) २३ ऑगस्ट २०१० च्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करताना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीची केली आहे. त्यानुसार राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ आणि ६ मार्च २०१३ (शुद्धीपत्रक) रोजीच्या निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी किमान व्यावसायिक पात्रता निश्चित केली. त्यात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीची केले.

परंतु २० जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार अनुंकपा तत्त्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ‘एनसीटीई’च्या निर्णयाशी विसंगत आहे. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने अलीकडेच घेतला होता.

त्यानुसार परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली होती. तसेच दिलेल्या मुदतीत उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांची सेवा समाप्त करून त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार टीईटी किंवा सीईटीईटी उत्तीर्ण नसलेल्या, पण अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देण्यात आलेली तीन वर्षांची मुदत वाढविली आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना पाच वर्षे मिळणार आहेत.

मुदतवाढीचे कारण काय?

शिक्षण विभागाने तीन वर्षांऐवजी पाच वर्षांची मुदत देण्यामागील नेमके कारण शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे निर्णयात एकाएकी बदल का करण्यात आला? पाच वर्षच का? टीईटी परीक्षा नियमित होत नसल्याने हा कालावधी आणखी वाढवणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. याचबरोबर टीईटी परीक्षा नियमितपणे झाली पाहिजे.

-विजयसिंह माने, अध्यक्ष, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT