Students
Students sakal
एज्युकेशन जॉब्स

Education: शिक्षणशास्त्र, विधी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या आठ अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच संपली आहे. त्यात मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे दिसून येते.

उच्च शिक्षण विभागांतर्गत बीए- बीएड, बी.एस्सी-बी.एड, बी.एड, एम.एड, पाच वर्षांचा विधी अभ्यासक्रम (एलएलबी- ५ वर्षे), तीन वर्षांचा विधी अभ्यासक्रम (एलएलबी-तीन वर्षे), एमपीएड, बीपीएड या आठ व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश होतो. या आठही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलमार्फत राबविण्यात येते. बी.एड या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सर्वात शेवटी म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपली. या आठही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा ७७.८५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर गेल्या वर्षी हे प्रमाण ७५.३५ टक्के, तर २०१९मध्ये ६३.६९ टक्के इतके होते.

गेल्या दोन वर्षामध्ये प्रवेशामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. बीए/बीएस्सी बीएड, एमएड या दोन्ही अभ्यासक्रमांना गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कमी प्रतिसाद मिळाला असला तरी २०१९च्या तुलनेत या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती आहे. त्याचप्रमाणे पाच वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल अधिक प्रवेश प्रक्रियेदरम्यान दिसून आले. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत २०१९मध्ये केवळ ४८.८७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर २०२१मध्ये हेच प्रमाण तब्बल ८१.०७ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. तीन वर्ष विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही दरवर्षी किमान एक टक्क्याने वाढ झाल्याचे निदर्शनास येते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: वडाळा येथे मोठी दुर्घटना! पार्किंग टॉवर कोसळले, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री शिंदे अन् अमित शहा रस्तेमार्गानं मुंबई एअरपोर्टकडं रवाना

Mumbai Rain: घाटकोपर हायवे पोलीस क्वार्टर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अनेकजण दबल्याची भीती

Rahul Gandhi Video : ''1 जुलै 2024 रोजी सकाळी अकाऊंट चेक करा, साडेआठ हजार रुपये आलेले असतील'', राहुल गांधींचा दावा

Interview : "सिनेमाच्या यशापयशाचा माझ्यावर परिणाम होत नाही" ; कासरा सिनेमातील जबरदस्त भूमिका आणि जोरम सिनेमावर स्मिताचं मत

SCROLL FOR NEXT