education news  Some cautionary points when making decisions for student
education news Some cautionary points when making decisions for student  sakal
एज्युकेशन जॉब्स

अखंड सावध चित्त रहावे

डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

निर्णय घेत असताना काही सावधानतेचे मुद्दे सांगतो. जाता जाता त्यांचा नक्कीच फायदा होईल. करिअरच्या शोधात काय करायचं ते महत्त्वाचं, तसं काय करू नये हे पण.

निर्णय घेत असताना काही सावधानतेचे मुद्दे सांगतो. जाता जाता त्यांचा नक्कीच फायदा होईल. करिअरच्या शोधात काय करायचं ते महत्त्वाचं, तसं काय करू नये हे पण. अनेक बाबतीत सावधानतेने पाऊल उचलणे, नंतरच्या पश्चात्तापापेक्षा फायद्याचे ठरते म्हणून हा शब्द प्रपंच. सावधानतेचे इशारे एवढ्यासाठी की आपण फसत तर नाही ना याची जाणीव असावी म्हणून.

मायाजालातून मिळणाऱ्या माहितीपासून

अशी माहिती परिपूर्ण आणि अद्ययावत असेलच अशी खात्री देता येत नाही. प्रत्यक्षातील अनुभव आणि केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टी यात अनेक वेळा फरक असू शकतो. त्यावर आधारित करायचा व्यवहार हा मायाजालाचा एक भागच असू शकतो. समोरासमोरील चर्चा आणि न पाहिलेल्या माणसाशी दूर संवाद करणं अनेक अर्थाने जोखमीचेच असते. आपण आपल्या विषयी काय आणि कोणती माहिती उघड करत आहोत हे सगळं सावधतेनेचं. ताक फुंकूनच पिलेले बरे!

प्रवेश मिळवून देतो म्हणणाऱ्या एजंटापासून ः अशा लोकांच्याकडून फसले जाण्याची शक्यता जास्त. गैरमार्ग वापरून घेतलेले असे प्रवेश पुढे आपल्यालाच धोका निर्माण करतात. ज्यावर विश्वास ठेवला अशी व्यक्तीच अशा वेळेस अदृश्य होऊन जाते. अशांच्याकडून अर्धवट माहिती दिली जाण्याची शक्यता जास्त असते.शेवटी सर्व व्यवहार हा आपला आपल्याला करायचा असतो म्हणून दुसऱ्यावर विसंबून रहाणे नकोच.

विश्वासार्हता ः महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करून पळत्याच्या मागे लागणे सयुक्तिक नाही. उलट विश्वासपूर्वक महाविद्यालयाकडेच चांगल्याची अपेक्षा धरण गरजेचं. आपण काय आणि कसे शिकतो हे महत्त्वाचं. प्रत्येक शिक्षक, प्राध्यापक हा त्याच्याकडील उत्तम तेच देत असतो.

अवास्तव सल्ला देणाऱ्यांपासून ः शालेय निकालानंतर जो तो फुकटचे सल्ले द्यायला, समुपदेशन करायला माग लागतो. त्यांच्या सांगण्यामागचं उद्दिष्ट वेगळेच असू शकते. ते वेळेवरच ओळखायला पाहिजे. अनेकजण प्रेमाने सांगतात पण ते फक्त फायद्याचे असेल तेच, त्याची दुसरी बाजू सांगितली जात नाही आणि आपणही कधी ती तपासून घेत नाही. सांगणारे अनेक असतात पण आपण मात्र आपल्याला पटेल, जमेल त्याचीच निवड करण आवश्यक असतं. काहींचे अनुभवाचे बोल असतात पण तो त्यांचा अनुभव असतो हे समजून घेणं आवश्यक.

आश्वासने देणाऱ्यांपासून ः फीमध्ये सवलत, मोफत संच भेट, असे आकर्षण निर्माण करून देणारे काहीतरी आपल्याकडून घेणारच असतात. मी तुम्हाला नक्की प्रवेश मिळवून देतो अशा व्यक्तीही काहीतरी अपेक्षा ठेऊनच असतात. आजचे आश्वासन हे उद्या परिपूर्ण होईल याची खात्री असतेच असे नाही.

खासगी कोर्सेस ः असंख्य प्रकारचे कोर्सेस खासगी लोकांकडून आयोजित करून तुम्हाला प्रशस्तीपत्रक मिळेल असे आश्वासन दिले जाते. अशा संस्था नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करा. अशा संस्थांमधून शिकल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर नोकरी मिळेल, त्याला मान्यता मिळेल असे होत नाही. शासन मान्यता हा महत्त्वाचा विषय आहे.

आपण विचारपूर्वक घेतलेले निर्णय हे आपल्याला नक्कीच अपेक्षित उद्दिष्ट साध्य केल्याचे समाधान देतील. सजगता, सावधानता, जागरूकता ही यशस्वी वाटचालीसाठी आवश्यकच असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT