students sakal media
एज्युकेशन जॉब्स

फाइन आर्ट्स CET परीक्षेचा निकाल रखडल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर

संजीव भागवत

मुंबई : राज्य कला संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बॅचलर इन फाइन आर्ट (BFA) या पदवी अभ्यासक्रमाच्या (degree syllabus) सीईटी परीक्षेचा निकाल (CET exam result) रखडला आहे. यामुळे पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश (Degree admission) हे लांबणीवर पडणार असल्याने प्रवेश प्रक्रिया कधी होणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून (students) केला जात आहे.

कला संचालनालयाच्या अंतर्गत बॅचलर इन फाइन आर्ट अभ्यासक्रम असलेले राज्यात 4 शासकीय महाविद्यालय असून यामध्ये प्रवेशासाठी 300 जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांसोबत देशभरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळावा म्हणून सीईटी आणि कला संचालनालयाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या एका ऑफलाईन लेखी परीक्षेची तयारी करत असतात. मात्र नुकतेच सीईटी सेल कडून उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बहुतांश अन्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे निकाल जाहीर केले असून त्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आणि महाविद्यालयांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यामुळे दिवाळीपूर्वी बॅचलर इन फाइन आर्ट या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करावा अशी.मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी की आहे. मागील वर्षी बॅचलर इन फाइन आर्ट या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला होता.

त्यात अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलले गेले होते, त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी हे कर्नाटक आदी राज्यात जाऊन शिक्षण घेत आहेत, ती वेळ पुन्हा येऊ नये आणि यंदा तरी राज्यातील विद्यार्थ्यांना किमान गुणवत्तेनुसार न्याय मिळावा अन्यथा आम्हाला या विद्यार्थ्यांसाठी दाद मागावी लागेल असा इशारा वाणी यांनी दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात महिन्यातील दूसरा सर्वात मोठा बदल! 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Pune Baner Dowry Harassment Case : 3 महिन्यांपूर्वी लग्न, बाणेरमध्ये विवाहितेनं संपवलं आयुष्य; पतीचं अमेरिकेत शिक्षण, 21 तोळे सोन्यासाठी छळ

Latest Marathi News Live Update : Mumbai Pune Expressway वर अवजड वाहनांना दोन दिवस बंदी

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

विज्ञानक्षेत्र अडकतेय कर्मकांडात!

SCROLL FOR NEXT