admission sakal
एज्युकेशन जॉब्स

अकरावीच्या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी शासकीय नियमाना हरताळ

ऑनलाईन प्रवेशात कोट्यातील प्रवेशासाठी आत्तापर्यंत असलेल्या शासकीय नियमाना हरताळ फासला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशात कोट्यातील प्रवेशासाठी आत्तापर्यंत असलेल्या शासकीय नियमाना हरताळ फासला जात आहे.

यासाठी अनेकदा पुरावे सादर करून शिक्षण विभागातील अधिकारी संस्थाचालकांचे हित साधण्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रवेश प्रक्रिया अडचणीत आणली जात असल्याने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सिस्कॉम संस्थेने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

27 मे 2003 च्या शासन निर्णयानुसार व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोटा हा नियमित प्रवेश प्रक्रिया पूर्वी 15 दिवस अगोदर ठराविक वेळेत वेळापत्रकानुसार राबविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु केंद्रीय प्रवेश समिती यांनी पत्रातील संदर्भीय परिपत्रकाद्वारे कोट्यातील प्रवेशासाठी वेळोवेळी वेळापत्रक जाहीर करत आहे. त्यामुळे 27 मे 2003 च्या शासन निर्णयानुसार वेळापत्रक जाहीर करत असले तरी यातील तरतुदीनुसार कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबविली जात नाही. त्यामुळे या कोट्या अंतर्गत होणारे प्रवेश शासकीय आदेशानुसार आधारित होत नसल्याचे सिस्कॉमने म्हटले आहे.

अकरावी प्रवेशासाठी 26 जून 1997 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व प्रवेश केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारे होतील असे निर्देश दिलेले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शेवटपर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच प्रवेश देणे आवश्यक आहे. त्यानुसार दर वर्षी 12 ते 14 प्रवेश फेऱ्याचे आयोजन करून देखील काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहात असल्याचे दिसून येत आहे. त्यावर 26 जून 1997 च्या शासन निर्णयात सर्व आरक्षित जागेवरील प्रवेश दिल्यांनतर अर्जांची दोन भागात राखीव विनाराखीव विभागणी करून स्वतंत्र गुणवत्ता याद्या तयार करून गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याचे निर्देश दिलेले आहे. याची अमलबजावणी करत केंद्रीय प्रवेश समितीने सामाजिक आरक्षणातून आर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिल्यांनतर जातीचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. असे निर्देश 30 ऑगस्ट 2021 च्या परिपत्रकात दिले आहे मात्र या न्यायालयाच्या सर्व निर्देशा हरताळ फासला जात असल्याचे सिस्कॉमने म्हटले आहे.

वेळापत्रक ठराविक वेळेत हवे होते..

टी.एम.ए.पै. यांच्या प्रकरणात सर्वोच न्यायालयाचे 11 बेंचच्या निकालानंतर 27 मे 2003 रोजीच्या शासन निर्णयात नियमित प्रवेश प्रक्रियेपूर्वी किमान 15 दिवस आगोदर ठराविक वेळेत वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या शासन निर्णयाची अमलबजावणी करत केंद्रीय प्रवेश समितीवरील परिपत्रकाद्वारे कोट्यातील प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करून प्रवेश गुणवत्तेनुसार प्रवेश करण्याचे केंद्रीय प्रवेश समिती निर्देश देत आहेत. परंतु त्यालाही केराची टोपली दाखवली जात असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT