Employment 
एज्युकेशन जॉब्स

पुणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी; लवकर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध क्षेत्रांमधील युवक-युवतींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत. प्रशिक्षण हे पूर्णपणे नि:शुल्क असून, प्रशिक्षणानंतर उमेदवारांना प्रमाणपत्रही प्राप्त होणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणांच्या माध्यमातून विविध रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उमेदवारांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. 

जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या १५ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठीची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे. तसेच ऑफलाइन नोंदणी आणि योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे या पत्त्यावर संपर्क साधावा. 

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आपले अर्ज सादर करावेत. तसेच, जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था यांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती उमेदवारांपर्यंत पोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे. 

- ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने फुंकले रणशिंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT