Engineer Automation Sakal
एज्युकेशन जॉब्स

इंजनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी AICTE ने दिली आनंदाची बातमी

तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांना अतिरिक्त अभ्यासक्रमासंदर्भातील सूचना

सुशांत जाधव

अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंजनिअरिंगला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य कोर्सशिवाय आता अन्य शाखेत प्रवेश घेणं शक्य होणार आहे. 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'नं (AICTE) यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सुचना आणि त्यांची मागणी लक्षात घेऊन यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'नं (AICTE) दिलेल्या माहितीनुसार, AICTE ची कार्यकारी समिती आणि EC समकक्ष समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला. तंत्रज्ञान शिक्षण देणाऱ्या विद्यापीठामध्ये मुख्य विषयासह अन्य शाखा निवडण्यासाठी बीटेक/बीई प्रवेश मिळवण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांनी बीटेक किंवा बीई अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे त्यांना शाखा बदलण्याची मुभा मिळेल. याशिवाय दुसर्‍या कोर्स/शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या शाखेच्या अभ्यासक्रमादरम्यान अभ्यास केलेल्या कोर्सचा भाग पुन्हा अभ्यासण्याची आवश्यकता देखील राहणार नाही.

बीटेक किंवा बीई मध्ये निवडलेल्या अभ्यासाचा पाठपुरावा करुन कार्यकारी समितीकडून विद्यार्थ्यांना अन्य शाखेची निवड करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाखेत प्रवेश घेताना महाविद्यालयामध्ये नियमित प्रवेश घ्यावा लागेल. तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांना अतिरिक्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यासंदर्भातील सूचना देखील करण्यात आल्याची माहिती AICTE ने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Toll Plaza Pass : अवघ्या ३४० रुपयांत मिळतोय टोल पास, करता येतो अमर्यादित प्रवास, 'या' वाहनधारकांना फायदा

Afghanistan–Pakistan War: अफगाण-पाक संघर्षाने घेतलं भीषण रूप! 15 चौक्या ताब्यात, 55 सैनिक ठार, सीमेवर रक्तरंजित संग्राम…

Video: ‘इंद्रकुमार, मला का घेतलं नाही?’'धमाल 4'बद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले...'अजयने मना किया क्या?'

SCROLL FOR NEXT