EXIM bank
EXIM bank google
एज्युकेशन जॉब्स

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी….भारतीय आयात-निर्यात बँकेत भरती सुरू

नमिता धुरी

मुंबई : भारतीय आयात-निर्यात बँकेत (एक्झिम बँक) अधिकारी पदासाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना www.eximbankindia.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. एप्रिल २०२२च्या जाहिरातीनुसार ३० जागा उपलब्ध आहेत. २८ एप्रिल ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. Mahasarkar.co.in या संकेतस्थळाशी संपर्क केल्यास एक्झिम बँकेतील भरतीविषयीची माहिती उमेदवारांना मिळत राहील.

या भरतीसाठी आवश्यक पात्रता, अभ्यासक्रम, लेखी आणि तोंडी परीक्षेसाठीच्या गुणांचे विभाजन आणि इतर महत्त्वाची माहिती https://mahasarkar.co.in/exim-bank-recruitment/ या लिंकवर उपलब्ध आहे. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी ६०० रुपये अर्ज शुल्क आहे तर अनुसूचित जाती-जमाती, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे. hrm@eximbankindia.in या ईमेल आयडीवरसुद्धा उमेदवारांना अर्ज पाठवता येईल.

अनुपालन, विधी, राजभाषा, माहिती, मानवस्रोत, संशोधन आणि विश्लेषण, कर्ज, माहिती प्रणाली लेखापरीक्षण, अंतर्गत लेखापरीक्षण, जोखीम व्यवस्थापन, प्रशासन, विशेष स्थिती समूह या विभागांमध्ये जागा उपलब्ध आहेत. https://www.eximbankindia.in/ हे बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

एमबीए, पीजीडीबीए, पदवी, पदव्युत्तर पदवी, सनदी लेखापाल, इत्यादी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT