uday samant
uday samant sakal
एज्युकेशन जॉब्स

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ; उदय सामंत

मीनाक्षी गुरव

पुणे - अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतंर्गत प्रवेशासाठी मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या फेरीतंर्गत प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत (ता.७) मुदत दिली होती. परंतु दरम्यान, विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत प्रवेश घेणे शक्य न झाल्याने, या प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्रवेशाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून विविध संघटनांकडून होत होती. तसेच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही सामंत यांच्याकडे मुदतवाढीची मागणी केली होती. याची दखल घेत सामंत यांनी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.

तसेच, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली जातपडताळणी बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी द्वितीय फेरीच्या प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्याचेही सामंत यांनी ‘ट्विटर’द्वारे कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT