Online registration. sakal
एज्युकेशन जॉब्स

Education : राज्य मुक्त विद्यालय मंडळात पाचवी-आठवीसाठी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीसाठी मुदतवाढ

विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नावनोंदणी अर्ज करण्यासाठी शनिवारपासून (ता. १६) सुविधा उपलब्ध होणार आहे. तर हे नोंदणी अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहेत.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या आणि जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या मूल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीचा अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे.

विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नावनोंदणी अर्ज करण्यासाठी शनिवारपासून (ता. १६) सुविधा उपलब्ध होणार आहे. तर हे नोंदणी अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांचे मूळ अर्ज, शुल्क आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करण्यासाठी १८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.

तर संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी ११ ऑक्टोबरपर्यंत विभागीय मंडळात जमा करायची आहे.

मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी ‘http://msbos.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी प्रकटनाद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT