Scholarship Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीच्या निकालानंतर गुणपडताळणीसाठी ४०२ विद्यार्थ्यांचे अर्ज

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यावर राज्यातील जवळपास ४०२ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी अर्ज केला आहे. गुणपडताळणीसाठी आलेल्या अर्जांनुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करण्याचे काम या आठवड्यात करण्यात येईल. साधारणतः: डिसेंबर अखेरपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यात मुंबई वगळता सर्वत्र परीक्षा परिषदेमार्फत पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल २४ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला. या निकालात इयत्ता पाचवीचे ५७ हजार ३३२ विद्यार्थी, तर आठवीचे २३ हजार९६२ असे एकूण ८१ हजार २९४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. अंतरिम निकाल लागल्यानंतर गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉग-इनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यासाठी पाच डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीत दाखल झालेल्या अर्जांची तपासणी करण्याचे काम सध्या करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका व उत्तरसूची यांची ऑनलाइन व प्रत्यक्ष तपासणी करून गुणपडताळणीचे काम या आठ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. यात गुणांमध्ये बदल होण्याची शक्यता फारशी नसते. पडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढण्यात येतील. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि जिल्हानिहाय गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम हाती घेतले जाईल. गुणवत्ता याद्यांसह शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचा परीक्षा परिषदेचा मानस आहे.

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालानंतर गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज :

*इयत्ता : गुणपडताळणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या

- इयत्ता पाचवी : २२७

- इयत्ता आठवी : १७५

- एकूण : ४०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT