jobs
jobs 
एज्युकेशन जॉब्स

MAHADISCOM साठी 5000 विद्युत सहाय्यकांची भरती ! जाणून घ्या शैक्षणिक पात्रता व ऑनलाइन अर्ज सादर करावयाची माहिती 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : राज्यातील बेरोजगार युवकांसाठी ही खास बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (MAHADISCOM) विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्याअंतर्गत एकूण पाच हजार पदे नियुक्त करण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार https://www.mahadiscom.in/en/home/ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

MAHADISCOM ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, 18 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया चालणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे असतील त्यांनी अधिकृत माहिती व सर्व तपशील वाचूनच अर्ज सादर करावेत. हे लक्षात ठेवा, की अर्जामध्ये काही दोष आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. 

उमेदवारांनी नोंद घ्यावी, की भरण्यात येणाऱ्या पाच हजार पदांमध्ये सर्वसाधारण 1673, महिला 1500, क्रीडापटू 250, माजी कर्मचारी 750, प्रोजेक्‍टेड 250, भूकंपग्रस्त 99, शिकावू उमेदवार 500 पदे भरली जाणार आहेत. 

शैक्षणिक पात्रता 
MAHADISCOM ने जारी केलेल्या नोटिफिकेशन (अधिसूचना) नुसार विद्युत सहाय्यक पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण व नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट (एनटीटीसी) धारक असणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर या पदावर ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार 18 ते 27 वर्षे वयोगटातील असावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT