Government Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

Government Jobs : या सरकारी नोकऱ्यांसाठी आताच करा अर्ज, ग्रॅज्युएट्सनाही मिळतेय सुवर्णसंधी

तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

साक्षी राऊत

Government Jobs : केंद्र सरकारने अनेक राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या सगळ्या पदांसाठी अर्जाची शेवटची तारीखसुद्धा फार जवळ आहे. तेव्हा उच्छुक उमेदवारांनी लगेच या नोकऱ्यांसाठी अर्ज करावा. तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

बँक ऑफ महाराष्ट्रकडून एक नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ज्यात क्रेडिट ऑफिसरच्या पदासाठी भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत साइट bankofmaharashtra.in वर अर्ज करा. या पदासाठी उमेदवारास ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यात एकूण १०० पदांची भरती करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर आहे.

इंडिया एक्झिम बँकेने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर केली आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर आहे. यात एकूण 45 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करणारा उमेदवार संबंधित विषयात ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षे असावे.

AIMS मध्ये नोकरी

सध्या देशातील सर्व अखिल भारतीय वैद्यकीय संस्थांमध्ये बंपर भरती सुरू आहे. जर तुम्ही एम्स नागपूरमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही aiimsnagpur.edu.in या अधिकृत साइटवर जाऊन अर्ज करू शकतात. शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. तर, हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवार एमडी, एमएस, डीएम, एमडीएस किंवा एमसीएच असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय पदानुसार 50/58 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बिलासपूर यांनी जूनियर रेजिडेंट पदाच्या 141 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइट aiimsbilaspur.edu.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. जे 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 पासून आयोजित केले जाईल. अर्जदाराने DCI द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून BDS उत्तीर्ण केलेले असावे. वॉक-इन-इंटरव्ह्यू प्रशासकीय ब्लॉक, 3रा मजला, एम्स-बिलासपूर, कोठीपुरा, हिमाचल प्रदेश-174037 येथे आयोजित केला जाईल. येथे अर्जासाठी उमेदवारांनी येथील अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT