NEET PG 2021 
एज्युकेशन जॉब्स

NEET PG 2021 : 18 तारखेला होणारी परीक्षा ढकलली पुढे; नवी तारीख लवकरच होणार जाहीर

NEET PG 2021 : 18 तारखेला होणारी परीक्षा ढकलली पुढे; नवी तारीख लवकरच होणार जाहीर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मेडीकल फिल्डमध्ये पुढील उच्च शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी दोनवेळा नॅशनल एलिजीबिलीटी टेस्ट (NEET PG) आयोजित केली जाते. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन (NBE) ने 14 एप्रिल रोजी नीट पीजी 2021 परिक्षेचे ऍटमिट कार्ड जाहीर केले आहेत. ही परीक्षा 18 एप्रिल 2021 रोजी होणार होती. मात्र आता ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी तसेच पालकांकडून या वर्षीची परिक्षा स्थगित करण्याची तसेच पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती.

याबाबतची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नीट पीजीची 18 एप्रिल रोजी होणारी प्रस्तावित प्रवेश परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. कोरोना व्हायरस महासंकटाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या संसर्गामुळे मेडीकलचे विद्यार्थी सोशल मीडियातून या परिक्षेला विरोध करत होते. तर काही विद्यार्थी या परिक्षेच्या आयोजनाविरोधात PIL दाखल करण्याच्या तयारीत देखील होते. या परीक्षेमध्ये जवळपास 2 लाखाहून अधिक मेडीकल विद्यार्थी सहभागी होणार होते.

मेडीकलचे विद्यार्थी ही परिक्षा पोस्टपोन करण्यासाठी #postponeneetpg या हॅशटॅग सहित मोहिम राबवत होते. मात्र या परिक्षेचे ऍडमिट कार्ड 14 एप्रिल रोजी जारी करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाच्या झालेल्या बैठकीत सीबीएसई परिक्षेबाबत निर्णय झाला. सीबीएसई बोर्डाच्या परिक्षा पोस्टपोन झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT