Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

Education : बारावीत उत्तीर्ण झालेल्या २२ हजार विद्यार्थ्याना पदवीसह; व्यावसायिकच्या प्रवेशाची संधी

महाविद्यालयात पदवीसोबत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी आदी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची संधी मिळणार.

संजीव भागवत

मुंबई - राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 22 हजार 144 विद्यार्थ्याना राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात पदवीसोबत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी आदी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची संधी मिळणार आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरही त्या विद्यार्थ्याच्या पदवी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणतेच आदेश आणि कार्यवाही नसल्याने यासंदर्भात 'सकाळ' ने मंगळवारी, 'बारावी उत्तीर्ण 22 हजार विद्यार्थी वेठीस' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा गलथानपणा समोर आणला होता.

तसेच मागील काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सलग वृत्त प्रसिद्ध करून यासाठी हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विषय मांडला होता. त्याची आज उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली.

त्यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विभागातील विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेश आणि त्यांच्या नोंदणीचे आदेश जारी केले आहेत.

डॉ. देवळाणकर यांनी आपल्या आदेशात बारावीचा एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, यासाठी विद्यापीठ, संलग्न महाविद्यालय स्तरावर प्रवेश देण्याचे आदेश जारी केले आहेत.

यात त्यांनी कला, विज्ञान व वाणिज्य विद्याशाखाच्या पदवी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे बाबतीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याचीही दक्षता घेण्याचे आदेश डॉ. देवळाणकर यांनी दिले आहेत.

दुसरीकडे तंत्र शिक्षण संचालनालयाने चे संचालक डॉ विनोद मोहीतकर यांनी ही तात्काळ आदेश जारी केले आहेत. त्यात तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील इयत्ता १० वीनंतरचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी,तंत्रज्ञान, वास्तुकला पदविका, इयत्ता बारावीनंतरचे औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी पदविका आणि इयत्ता बारावी आयटीआयनंतरचे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आदेश जारी केले आहेत.

डॉ. मोहीतकार यांनी आपल्या आदेशात संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या प्रथम वर्ष पदविका, थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय प्रवेशाकरिता पात्र आहेत. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशास पात्र असलेल्या उमेदवारांना संस्थास्तरीय प्रथम व थेट व्दितीय वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संचालनालयाच्या dtemaharashtra.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

अशा नोंदणी केलेल्या उमेदवारांना संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल व प्रथम वर्ष पदविका आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमास प्रवेश निश्चित करता येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

Pune News: भाजप इच्छुकांच्या स्वप्नांना कात्री; पुण्यात स्वीकृत नगरसेवकांना पाच वर्षांचे नियुक्ती प्रमाणपत्र, नव्याने प्रक्रिया हाेणार!

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Beed District News: कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ‘शेती शाळा’; शेतकऱ्यांना बांधावरच हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

Maharashtra River Pollution: नद्या प्रदूषण रोखण्यासाठी प्राधिकरण; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, दोन हजार कोटींचा निधी उभारणार, काेणत्या नद्या स्वच्छ हाेणार?

SCROLL FOR NEXT