Career Break 
एज्युकेशन जॉब्स

जर तुम्ही करिअरच्या ब्रेकवर असाल तर लक्षात ठेवा "या' गोष्टी !

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : करिअरचा ब्रेक घेणे ही सामान्य गोष्ट नाही. काही लोक आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी विश्रांती घेतात, काहींना नोकरी सोडल्यानंतर सक्तीची सुटी घ्यावी लागते, काहीजण सध्याच्या नोकरीत आनंदी नसल्यामुळे विश्रांती घेतात... कारण काहीही असो, हे लक्षात ठेवा की आनंद लुटण्याऐवजी "का' आणि "काय होणार...' यावर चर्चा व विचार करत बसू नका. आपल्या कारकिर्दीत अधिकाधिक विश्रांती व आनंद कशी घेऊ शकता, याचा विचार करा. 

छंदांना द्या पुनर्जन्म 
"मी लहानपणापासूनच पियानो वाजवायचे, पण कालांतराने हा छंद हळूहळू मागे पडला', असं नादिया शाह म्हणाल्या. "करिअरच्या ब्रेक दरम्यान मी माझ्या नवजात बाळाची काळजी घेतली, मी एक कीबोर्ड विकत घेतला आणि दररोज एका तासासाठी वाजवण्यास करण्यास सुरवात केली. यामुळे माझे आयुष्य खूप आनंदाने भरले.' म्हणून तुम्हाला जे काही घोडेस्वारी, चित्रकला किंवा इतर गोष्टी करण्यास आवडत असेल परंतु वेळेअभावी ते करणे शक्‍य झाले नाही तर विश्रांती दरम्यान ते करा. फक्त लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या जुन्या छंदांपैकी एक पुन्हा जगणे आवश्‍यक आहे. 

स्वत:ला वेगळे करू नका 
करिअरच्या ब्रेकवर जाण्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जुन्या आयुष्यापासून पूर्णपणे वेगळे झाला आहात. आपल्या जुन्या सहकारी आणि व्यावसायिकांच्या संपर्कात राहा जेणेकरून आपल्या कामाच्या क्षेत्राबद्दल आपल्याला माहिती मिळत राहील. सोशल मीडियाचा वापर करून फार सुज्ञपणे वापरा. पुस्तके, ऑनलाइन लेख, वर्तमानपत्रे, मासिके यांपैकी कोणतीही एक वाचा. आपली माहिती वाढवण्याचा हा सर्वांत सोपा मार्ग आहे. 

पुन्हा लक्ष लक्ष केंद्रित करा 
आपण या कालावधीचा वापर आवश्‍यक कौशल्ये विकसित करण्यासाठी करू शकता. आपल्या कारकिर्दीत आपण काय करू इच्छिता याचा विचार करण्यासाठी या वेळेचा वापर करा. जुन्या नोकरीवर परत जायचे असेल, नवीन जागेचा प्रयत्न करायचा असेल तर क्षेत्र बदलावे किंवा स्वतःचे काहीतरी सुरू करावे. आपले विचार लिहा आणि निर्णय घेण्यास घाई करू नका. 

प्रवास करा 
विश्रांती कालावधीत शक्‍य तितका प्रवास करा. विशेषत: आता आपल्याला सुटीसाठी अर्ज करण्याची देखील गरज नाही. प्रवास म्हणजे रिफ्रेश आहे आणि ज्ञानात भर घालण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. 

लाज वाटून घेऊ नका 
""जेव्हा मी माझ्या करिअरच्या दिशेने गोंधळलेली होते तेव्हा मी थोडावेळ कामातून ब्रेक घेतला होता आणि त्या काळात मी "अरे तू आराम करतोस, तू किती भाग्यवान आहेस' अशा गोष्टींचा सामना करावा लागला. त्यामुळे मला बऱ्याच वेळा अस्वस्थ झाले'' असे सेल्स प्रोफेशनल धनू गोपीनाथ म्हणतात. ""परंतु नंतर मला समजले, की मला निवड करण्याची संधी मिळाली आणि मी अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देणे बंद केले.'' आपल्या निवडीची लाज वाटू घेऊ नका, परंतु आपण निर्णय घेण्याच्या स्थितीत होता याचा आनंद घ्या. आपल्या मुलांबरोबर वेळेचा आनंद घ्या. आणखी काय घडू शकले असते, याचा विचार करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT