scholarship exam sakal
एज्युकेशन जॉब्स

‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षे’साठी (एनएमएमएस) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत यंदा वाढ करण्यात आली.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षे’साठी (एनएमएमएस) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत यंदा वाढ करण्यात आली.

पुणे - इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षे’साठी (एनएमएमएस) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत यंदा वाढ करण्यात आली आहे. आता साडे तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. यंदा ही परीक्षा १८ डिसेंबर रोजी होणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यापूर्वी दीड लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येत होती. आता पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ केली आहे. तसेच एनएमएमएस परीक्षेद्वारे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना याआधी इयत्ता नववीपासून ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असे. आता शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज परिषदेच्या ‘https://www.mscepune.in/’ आणि ‘https://nmmsmsce.in’ या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध आहेत. राज्यातील कोणत्याही शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यातील विविध केंद्रावर १८ डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे.

देश पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. या कोट्यानुसार राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. या परीक्षेचा निकाल साधारणत: फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धी निवेदनाद्वारे दिली आहे.

‘एनएमएमएस’ परीक्षेचे वैशिष्ट्ये -

- शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून होणार

- परीक्षेसाठी विषय : बौद्धिक क्षमता चाचणी (९० गुण आणि ९० प्रश्न), शालेय क्षमता चाचणी (९० गुण आणि ९० प्रश्न)

- मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू व कन्नड सात माध्यमात होणार परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT