Increased time for offline exams uday samant nashik esakal
एज्युकेशन जॉब्स

ऑफलाइन परीक्षेसाठी वाढीव वेळ - उदय सामंत

मंत्री उदय सामंत यांची माहिती; दोन पेपरमध्ये दोन दिवसांचा अवधी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विद्यार्थ्यांच्‍या हिताचा विचार करता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत १३ अकृषी विद्यापीठांच्‍या कुलगुरूंच्‍या बैठकीत ठरले आहे. राज्‍य सरकारने कुलगुरूंच्‍या भूमिकेला संमती दिली आहे. विद्यार्थ्यांच्‍या सोयीसाठी एक तासाच्‍या परीक्षेसाठी अतिरिक्‍त १५ मिनिटे वाढवून दिले जातील. त्‍यानुसार तीन तासांच्‍या परीक्षेसाठी अतिरिक्‍त पाऊण तासांचा वेळ मिळेल. शिवाय दोन पेपरमध्ये दोन दिवसांचा अवधी ठेवला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या दीक्षांत समारंभानिमित्त नाशिक दौऱ्यावर असताना, मंत्री सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्‍हणाले, की परीक्षा ऑफलाइन घेण्यासंदर्भात सरकारने कुठलाही आदेश काढलेला नाही. कुलगुरूंच्‍या बैठकीत ठरलेल्‍या भूमिकेला समर्थन दर्शविले आहे. परिस्‍थिती सामान्‍य झालेली असताना, ऑफलाइन परीक्षा विद्यार्थी हिताची असल्‍याचा पुर्नउच्चारही त्‍यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्‍या युवा संघटनांमार्फत ऑफलाइन परीक्षेला विरोध न करण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

स्‍वाक्षरीनंतर कुलगुरु निवड प्रक्रियेला वेग

‘‘अधिसभा, व्‍यवस्‍थापन परिषदेत प्रतिनिधित्‍वासाठी शैक्षणिक अर्हता असावी यांसह अन्‍य दुरुस्‍तीसंदर्भातील विधेयक राज्‍यपालांकडे स्‍वाक्षरीला गेले आहे. अद्याप स्‍वाक्षरी न झाल्‍याची माहिती मिळाली आहे. येत्‍या आठवड्यात राज्‍यपालांची भेट घेणार आहे. अध्यादेशावर स्‍वाक्षरी झाल्‍यानंतर कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला गती मिळेल,’’ असे सामंत म्हणाले.

दोन्ही काँग्रेसच्या वादावर बोलणे टाळले

काँग्रेसच्‍या प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसंदर्भात विधान केले. उपमुख्यमंत्री व ‘राष्ट्रवादी’च्‍या प्रदेशाध्यक्षांनीही त्‍यास समर्पक उत्तर दिले आहे. त्‍यामुळे या दोन पक्षांच्‍या वादावर शिवसैनिक म्‍हणून बोलणे उचित नसल्‍याचे उदय सामंत म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT