IBPS
IBPS Sakal
एज्युकेशन जॉब्स

IBPS ने केली विविध बॅंकांच्या 4135 PO/MT पदांसाठी अधिसूचना जारी!

श्रीनिवास दुध्याल

IBPS ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये एकूण 4135 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तसेच विविध बॅंकांमध्ये 7855 लिपिक पदांच्या भरतीसाठीही अर्ज प्रक्रिया आधीच झाली सुरू आहे.

सोलापूर : राष्ट्रीय बॅंकांमध्ये (National Banks) सरकारी नोकरी (Government job) शोधणाऱ्या आणि IBPS PO परीक्षा 2021 ची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी मोठी बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्‍शन (Institute of Banking Personnel Selection - IBPS) ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये एकूण 4135 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बॅंक, पंजाब अँड सिंध बॅंक, यूको बॅंक आणि युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

IBPS PO/MT साठी करा असा अर्ज

सरकारी बॅंकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनीच्या 4000 हून अधिक पदांवर भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार IBPS च्या ibps.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवार 20 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत नोंदणी करू शकतील. तसेच त्याच तारखेपर्यंत उमेदवारांना विहित अर्ज शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल.

7855 लिपिक पदांसाठीही अर्ज प्रक्रिया सुरू

आयबीपीएस लिपिक 2021 अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील विविध बॅंकांमध्ये 7855 लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आधीच झाली सुरू आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्‍शन (IBPS) ने 7000 प्लस लिपिक पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्‍टोबर 2021 निश्‍चित केली आहे. या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक तपशिलांसाठी उमेदवार IBPS लिपिक भरती 2021 ची अधिसूचना तपासू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT