ITBP google
एज्युकेशन जॉब्स

ITBP Recruitment : दहावी उत्तीर्णांना संरक्षण दलात काम करण्याची संधी

उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

नमिता धुरी

मुंबई : संरक्षण दलात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी कॉन्स्टेबल ग्रुप सी च्या पदांवर पात्र पुरुषांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या सर्व उमेदवारांनी recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावेत.

उमेदवार १९ ऑगस्ट २०२२ पासून भरतीसाठी अर्ज करू शकतील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर २०२२ आहे. या भरतीद्वारे कॉन्स्टेबलची एकूण १०८ पदे भरली जातील. (ITBP Recruitment)

ITBP कॉन्स्टेबल भरती २०२२ रिक्त जागा तपशील

एकूण पदे - १०८

कॉन्स्टेबल (सुतार) – ५६ पदे

कॉन्स्टेबल (मेसन) – ३१ पदे

कॉन्स्टेबल (प्लंबर) – २१ पदे

वय मर्यादा

उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म १८ सप्टेंबर १९९९ च्या आधी आणि १७ सप्टेंबर २००४ च्या नंतर झालेला नसावा.

शैक्षणिक पात्रता

कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ४०० रुपये भरावे लागतील. यासोबतच एससी, एसटी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

कॉन्स्टेबल पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट, पीईटी, पीएसटी आणि तपशीलवार वैद्यकीय चाचणी या प्रक्रियेतून जावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT