railway recruitment google
एज्युकेशन जॉब्स

JOB UPDATES: ८वी आणि १०वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी

अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2022 आहे.

नमिता धुरी

मुंबई : रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेने ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcpryj.org वर जाऊन अर्ज करू शकतात. आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, सुतार, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक, वायरमन, क्रेन, स्टेनो, आरोग्य स्वच्छता निरीक्षक अशा एकूण 1,664 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता

भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र (NCVT मधून मान्यताप्राप्त) असणे आवश्यक आहे.

या भरतीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड 10वी आणि ITI गुणांच्या आधारे शिकाऊ उमेदवारासाठी केली जाईल.

ज्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे, त्यांच्या गुणवत्तेमध्ये 10वीचे गुण आणि ITI गुणांना 50-50 टक्के महत्त्व दिले जाईल. ज्या पदांसाठी ८ वी पासची पात्रता आवश्यक आहे, त्यामध्ये ८ वी आणि आयटीआयचे सरासरी गुण घेतले जातील.

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षे असावे. आरक्षित पदांच्या उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

अर्ज फी

अनारक्षित उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Infosys करणार शेअर बायबॅक! जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स!

ICC ODI Ranking मध्ये मोठा बदल! रोहित शर्माने गमावला अव्वल क्रमांक, 'या' खेळाडूने पटकावलं सिंहासन

Mumbai Local: मुंबई लोकलची सेवा कोलमडली! तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना मनस्ताप

वयाची पन्नाशी गाठली; तरीही अविवाहित का आहे सुष्मिता सेन? स्वतः सांगितलेलं कारण, म्हणाली- माझ्या आयुष्यात...

Latest Marathi Breaking News Live Update : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT