indian army google
एज्युकेशन जॉब्स

भारतीय लष्करात सेवेची संधी

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे आहे.

नमिता धुरी

मुंबई : भारतीय लष्कराच्या बिहार तुकडीने ग्रुप सी पदांसाठी भरती सुरू केली आहे. या गटात आचारी, धोबी, न्हावी, सफाई कामगार, सुतार या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील. त्यांचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे आहे. सफाई कामगार या पदासाठी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता आहे. आचारी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. तसेच त्याला भारतीय जेवण करता यावे आणि व्यावसायिक ज्ञान असावे.

धोबी पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती दहावी उत्तीर्ण असावी व तिला लष्करी तसेच सामान्य कपडे धुता येणे आवश्यक आहे. न्हावी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा व त्याला न्हाव्याचे कौशल्य अवगत असावे. सुतार पदासाठी काम करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अथवा व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेचे ३ वर्षांचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र असावे.

सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे. यात सफाई कामगार आणि आचारी पदासाठी इतर मागासवर्गीयांना ३ वर्षे, अनुसूचित जाती आणि जमातींना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे. धोबी पदासाठी केवळ इतर मागसवर्गीयांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. न्हावी पदासाठी इतर मागसवर्गीयांना ३ वर्षांची आणि अनुसूचित जातींना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. सुतार पदासाठी वयोगटामध्ये कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. पात्र उमेदवारी आपले अर्ज १३ मेपर्यंत स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT