Maharashtra Krishi Din sakal
एज्युकेशन जॉब्स

Maharashtra Krishi Din : शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना कोणत्या? किती मिळतो लाभ? जाणून घ्या

Government Schemes for Farmers: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या मदतीनं सिंचनापासून ते आर्थिक मदतीपर्यंत सर्व काही दिले जात आहे. त्यांना पीएम किसान अंतर्गतच नव्हे तर अनेक योजनांतर्गतही लाभ मिळतात. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

पंतप्रधान पीक विमा योजना

पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. आपत्ती, कीड किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा योजनेंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. देशातील कोणताही शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. जी 4 महिन्यांच्या अंतराने दिली जाते.

किसान क्रेडिट कार्ड

केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी किंवा शेतीवरील खर्चासाठी पुरेसे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली होती. केंद्र सरकारच्या योजनांतर्गत, भारत सरकार शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी वार्षिक 4 टक्के सवलतीच्या दराने शेतीसाठी सरकारी अनुदानाच्या स्वरूपात मदत करते.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT