MPSC Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

आता राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा होणार 'CCTV'च्या कडक देखरेखीखाली

सकाळ डिजिटल टीम

MPSC Exam : परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आयोगाकडून ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यामूळे एमपीएससी परीक्षा या गैरप्रकार विरहीत होण्यास मदत होणार आहे

आयोगाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत सांगण्यात आले आहे की, पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 मध्ये उमेदवारांकडून होऊ शकणारे संभाव्य गैरप्रकार विचारात घेऊन आयोगाकडून सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

प्रस्तुत परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे देखील आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे आता एमपीएससी परीक्षेत होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारास आळा बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT