Open School
Open School Sakal
एज्युकेशन जॉब्स

मुक्त विद्यालयात ५ वी आणि आठवीसाठी अर्ज भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

मीनाक्षी गुरव

पुणे : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज करण्यासाठी १ ते ३१ मार्च पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे. (Open Schooling Admission Application Updates)

यापूर्वी राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता हा कालावधी संपुष्टात येत आहे. मंडळाने नव्याने दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागणार आहेत.

त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी १ ते ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. तर विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जात नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करण्यासाठी २ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत मुदत आहे. तसेच संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करण्यासाठी ७ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

मुक्त विद्यालय मंडळामध्ये ५ वी आणि ८वीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळ : http://msbos.mh-ssc.ac.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

SCROLL FOR NEXT