tet exam sakal media
एज्युकेशन जॉब्स

‘टीईटी’ परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर

उत्तरसूचीवर आक्षेप नोंदविण्यासाठी ८ डिसेंबरपर्यत मुदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्यात २१ नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. याच्या टीईटी परीक्षेच्या ‘पेपर क्रमांक एक’साठी दोन लाख ५४ हजार ४२८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील दोन लाख १६ हजार ६०४ उमेदवार उपस्थित होते. तर ३७ हजार ८२४ अनुपस्थित होते. या परीक्षेच्या ‘पेपर क्रमांक दोन’साठी दोन लाख १४ हजार २५१ उमेदवारांची नोंदणी झाली होती. यातील एक लाख ८५ हजार ४३९ उमेदवार उपस्थित होते. तर २८ हजार ८१२ अनुपस्थित होते. एकूण ६६ हजार ६३६ उमेदवार गैरहजर होते.

या परीक्षेच्या पेपर क्रमांक एक आणि दोन याबाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रूटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे सादर करण्यासाठी आठ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. आक्षेप किंवा त्रुटी ‘http://mahatet.in’ या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लाँगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठविता येणार आहेत.

आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष, टपालाने किंवा ई-मेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. परिषदेने दिलेल्या मुदतीत ऑनलाइनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४०० धावांचा विक्रम का मोडला नाही? Wiaan Mulderने सांगितली मन जिंकणारी गोष्ट; म्हणाला, ब्रायन लारा..

प्रसिद्ध उद्योजकाची घराजवळ गोळ्या झाडून हत्या; सात वर्षांपूर्वी मुलावरही झाडल्या होत्या गोळ्या, दोघांचा कोणासोबत झालाय वाद?

Latest Maharashtra News Updates : एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमान्यांचे हाल

Mobile Recharge : मोबाईल वापरकर्त्यांना झटका! रिचार्जचे दर 10-12% ने पुन्हा महागणार, कोणत्या कंपनीचे किती पैसे? जाणून घ्या..

11th Admission : इ. ११ वी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; पसंतीक्रम लॉक करण्यासाठी १० ते १३ जुलैची मुदत

SCROLL FOR NEXT